Juhi Chawla : जय मेहता यांची दुसरी पत्नी होण्याचा जुही चावलाने का घेतला निर्णय? अभिनेत्रीनेच सांगितलं कारण
Juhi Chawla : कोण होती जुही चावला हिच्या पती पहिली पत्नी? विवाहित पुरुषासोबत लग्न केल्याचं सत्य जुही हिने का लपवलं? अभिनेत्रीकडून मोठा खुलासा...जाणून घ्या अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याबद्दल... सध्या सर्वत्र जुही चावला हिच्या खासगी आयुष्याबद्दल चर्चा
मुंबई | 13 नोव्हेंबर 2023 : 90 च्या दशकात एकापेक्षा एक सिनेमांमध्ये काम करत चाहत्यांच्या मनावर आणि बॉलिवूडवर राज्य करणाऱ्या अनेक अभिनेत्री आज झगमगत्या विश्वापासून दूर आहेत. पण अभिनेत्री त्यांच्या खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असतात. आता सध्या अभिनेत्री जुही चावला हिच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे. जुही चावला हिने 1995 साली उद्योजक जय मेहता यांच्यासोबत लग्न केलं. लग्नानंतर सहा वर्ष अभिनेत्रीने लग्न केल्याचं सत्य कोणालाही सांगितलं नाही. याचं कारण खुद्द अभिनेत्री एका मुलाखतीत सांगितलं.
जुही चावला हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने 1986 करियरला सुरुवात केली. करियरमध्ये यशाच्या शिखरावर चढत असताना अभिनेत्रीने उद्योजक जय मेहता यांच्यासोबत लग्न केलं. पण जेव्हा अभिनेत्री गरोदर राहिली तेव्हा जुही चावला हिच्या लग्नाबद्दल सर्वांना कळलं.
दरम्यान एका मुलाखतीत खुद्द अभिनेत्रीने लग्नाबद्दल मोठा खुलासा केला. जुही म्हणाली, ‘लग्न केलं तेव्हा मी करियरमध्ये यशाच्या शिखरावर होती आणि लग्नाबद्दल सांगितलं असतं तर, माझं करियर संपलं असतं…’आता अभिनेत्री झगमगत्या विश्वापासून दूर असली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. एवढंच नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील अभिनेत्री कायम चर्चेत असते.
जय मेहता यांची पहिली पत्नी
जुही चावला ही जय मेहता यांची दुसरी पत्नी आहे. जय मेहता यांच्या पहिल्या पत्नी विमान अपघातात निधन झालं. पहिल्या पत्नीच्या निधनानंतर जय मेहता पूर्णपणे खचले होते. तेव्हा जुही चावला हिने जय मेहता यांना आधार दिला. त्यानंतर जय मेहता आणि जुही चावला यांनी लग्न केलं.
आज जुही चावला आणि जय मेहता त्यांच्या वैवाहिक आयुष्यात आनंदी आहेत. दोघांमध्ये सहा वर्षांचं अंतर आहे. लग्नानंतर जुही चावला हिने दोन मुलांना जन्म दिला जुही हिच्या मुलीचं नाव जान्हवी मेहता आहे तर, मुलाचं नाव अर्जुन मेहता आहे.
जुही चावला गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर आहे. पण अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. अभिनेत्री इन्स्टाग्रामवर कायम मुलांसोबत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. जुही बॉलिवूडपासून दूर असली तरी तिच्या चाहत्यांची संख्या कमी झालेली नाही.
सोशल मीडियावर देखील जुही हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे आणि कुटुंबाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.