Juhi Chawla | ‘वाईट काळत सासूबाईंनी साथ…’, जुही चावला हिच्या आयुष्यातील मोठं सत्य समोर
आयुष्यातील वाईट दिवसांच्या आठवणी ताज्या करत जुही चावला सासूबाईंबद्दल म्हणाली..., सध्या सर्वत्र जुही हिच्या वैवाहिक आयुष्याच्या चर्चा...

मुंबई | 31 जुलै 2023 : ‘डर’, ‘कयामत से कयामत तक’, ‘यस बॉस’, ‘भूतनाथ’, ‘फिर भी दिल है हिंदुस्तानी’, ‘हम हैं राही प्यार के’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत अभिनेत्री जुही चावला हिने चाहत्यांच्या मनात राज्य केलं. जुही कायम तिच्या सौंदर्यामुळे आणि अभिनयामुळे चर्चेत राहिली. अभिनेत्रीचं खासगी आयुष्य कायम गुलदस्त्यात होतं. १९९५ मध्ये जुही हिने उद्योजक जय मेहता यांच्यासोबत लग्न केलं. जुहीने अनेक वर्ष लग्न चाहत्यांपासूव लपवून ठेवलं. बॉलिवूडमध्ये स्वतःचे स्थान भक्कम करणाऱ्या जुहीच्या आयुष्यात मात्र अनेक अडचणी आल्या.
आई – वडिलांना गमावल्यानंतर जुही चावला हिने भाऊ बॉबी चावला याला देखील गमावलं. अभिनेत्रीचा भाऊ अभिनेता शाहरुख खानच्या ‘रेड चिलिज एन्टरटेनमेंट’ कंपनीचा सीईओ होता. २०१० साली बॉबी याला मोठा धक्का बसला आणि अभिनेत्रीचा भाऊ कोमामध्ये गेला. त्यानंतर २०१४ मध्ये बॉबी चावला याचं निधन झालं. यावेळी जुही हिला पती आणि सासूबाईंची साथ मिळाली.
जुही आणि जय यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, दोघांची पहिली भेट दिग्दर्शक राकेश रोशन यांच्या माध्यमातून झाली होती. पण तेव्हा जय मेहता विवाहित होते. त्यांच्या पहिल्या पत्नीचं नाव सुजाता बिर्ला होतं. पण सुजाता यांचं निधन झाल्यानंतर जय आणि जुही यांच्यांमध्ये प्रेम बहरलं. अनेक ठिकाणी दोघांना एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं.
पण काही काळ सरल्यानंतर जुहीवर देखील दुःखाचा डोंगर कोसळला..जुहीच्या आईचं कार अपघातात निधन झालं. तेव्हा जय मेहता यांनी जुहीला सांभाळलं. ज्यामुळे दोघांच्या लग्नाला आणखी उशीर झाला. आईच्या निधनाच्या धक्क्यातून सावरण्यासाठी फार काळ लागला. अखेर अभिनेत्रीने उद्योजक जय मेहता यांच्यासोबत गुपचूप लग्न केलं
एका मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली, ‘तेव्हा प्रत्येक ठिकाणी कॅमेरे नव्हते, इंटरनेट नव्हता… जय माझी काळजी घेत होते.. मला माझ्या करियरची भीती वाटत होती..तेव्हा माझं करियर यशाच्या उच्च शिखरावर होतं. मला काम करायचं होतं. त्यामुळे मी मधला रस्ता अवलंबला…’ असं अभिनेत्री म्हणाली. म्हणून अभिनेत्रीने अनेक वर्ष लग्न झालं असल्याची गोष्ट लपवली होती.
जुही बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर मात्र कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. जुही आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, कोणत्या न कोणत्या कारणामुळे कायम चर्चेत असते.