Juhi Chawla हिचा 1984 सालचा व्हिडीओ पाहून चाहते हैराण; म्हणले…
आता बॉलिवूडपासून दूर असलेल्या अभिनेत्री जुही चावला हिचा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल; सर्वत्र अभिनेत्रीच्या व्हिडीओची तुफान चर्चा... पाहा व्हिडीओ...
Juhi Chawla Throwback Miss Universe Video : ‘डर’, ‘कयामत से कयामत तक’, ‘इश्क’, ‘यस बॉस’, ‘बोल राधा बोल’ यांसारख्या एकापेक्षा एक सिनेमातून बॉलिवूडवर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे जुही चावला. एका काळ असा होता जेव्हा सर्वत्र जुही चावला हिच्या अभिनयाची आणि सौंदर्याची चर्चा होती. बॉलिवूडवर राज्य करत असताना जुहीने अनेकांच्या मनावर राज्य केलं. फक्त चाहतेच नाही तर, अनेक सेलिब्रिटी देखील जुहीच्या प्रेमात होते. आता जुहीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ १९८४ मधील जुहीच्या मिस यूनिवर्स पेंजेट कॉम्पिटिशन दरम्यानचा असल्याचा सांगण्यात येत आहे.
जुहीच्या व्हायरल व्हिडीओवर अनेक चाहते कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत. महत्त्वाचं म्हणजे जुहीचा व्हिडीओ पाहून चाहते अभिनेत्रीची तुलना सध्याच्या घडीची प्रसिद्ध अभिनेत्री किआरा अडवाणी हिच्यासोबत करत आहेत. द पेजेन्ट गिल्ट्ज यांच्याकडून व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. सध्या सर्वत्र जुहीच्या जुन्या व्हिडीओची चर्चा रंगत आहे.
View this post on Instagram
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता अभिनेत्री प्रचंड तरुण दिसत आहे. त्यामुळे अंदाज लावण्यात येत आहे की, व्हायरल होत असलेला व्हिडीओ किती जुना आहे. जुहीच्या व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये, ‘बॉलीवूड अभिनेत्री जुही चावलाने 1984 साली फेमिना मिस इंडियाचा किताब जिंकला होता. मियामी फ्लोरिडा 1984 मध्ये मिस युनिव्हर्स स्पर्धेत तिने भारताच्या वतीने भारताचे प्रतिनिधित्व केलं. यासोबतच जुही चावलाने या स्पर्धेदरम्यान कॉस्ट्यूम अवॉर्ड पटकावला होता.
जुही चावलाचा हा व्हिडीओ पाहून चाहते आभिनेत्रीची तुलना किआरा अडवाणी हिच्यासोबत करत आहेत. सध्या सर्वत्र जुहीची चर्चा होत आहे. एक युजर कमेंट करत म्हणाला, ‘ही तर किआरा अडवाणी सारखी दिसत आहे.’ सध्या सर्वत्र जुही चावला हिच्या व्हिडीओची चर्चा आहे.
आता जुही बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, वैवाहिक आयुष्यात मात्र आनंदी आहे. यशाचं शिखर चढत असताना १९९५ साली जुही हिने जय मेहता यांच्यासोबत गुपचून लग्न केलं. पण लग्न झाल्यानंतर ६ वर्ष अभिनेत्रीनं नातं लपवून ठेवंल. जेव्हा जुही चावला पहिल्यांदा गरोदर राहिली, तेव्हा जुही आणि जय मेहता यांच्या लग्नाबद्दल चाहत्यांना कळालं. आज अभिनेत्री वैवाहिक आयुष्यचा आनंद घेत आहे.
जुही कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहच्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.