Jui Gadkari: ‘आपण गेल्यावर कोणाचं तरी आयुष्य खूप पॉझिटिव्हली बदलेल,’ जुई गडकरीच्या निर्णयाचं नेटकऱ्यांकडून कौतुक

'कुठल्याही हॉस्पिटलला एक सेक्शन असतं- ऑर्गन ट्रान्सप्लांट असं. बरीच मोठी रांग असते तिथे. लोक हातात जाडजूड फाईल्स घेऊन ताटकळत उभे असतात.'

Jui Gadkari: 'आपण गेल्यावर कोणाचं तरी आयुष्य खूप पॉझिटिव्हली बदलेल,' जुई गडकरीच्या निर्णयाचं नेटकऱ्यांकडून कौतुक
Jui GadkariImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 14, 2022 | 4:30 PM

दरवर्षी 13 ऑगस्ट हा जागतिक अवयवदान दिन (International Organ Donor Day) म्हणून साजरा केला जातो. यादिवशी अनेक संस्थांकडून, सेलिब्रिटींकडून अवयव दानाबद्दल जागरूकता निर्माण केली जाते, त्याच्याशी संबंधित असलेल्या विविध गैरसमज आणि अफवा दूर केल्या जातात. या खास दिवशी मराठी अभिनेत्री आणि बिग बॉस मराठी 1 फेम जुई गडकरीनेदेखील (Jui Gadkari) या मोहिमेत भाग घेतला आणि अवयव दान (Organ Donation) करण्याचं वचन दिलं. जुईने हृदय, आतडे, मूत्रपिंड, यकृत, फुफ्फुसे, स्वादुपिंड आणि डोळे दान करण्याचं वचन दिलं आहे. याविषयी तिने सोशल मीडियावर एक पोस्टसुद्धा लिहिली आहे.

जुई गडकरीची पोस्ट-

‘कुठल्याही हॉस्पिटलला एक सेक्शन असतं- ऑर्गन ट्रान्सप्लांट असं. बरीच मोठी रांग असते तिथे. लोक हातात जाडजूड फाईल्स घेऊन ताटकळत उभे असतात. ऑर्गन ट्रान्सप्लांटसाठी नंबर लावावा लागतो म्हणे. आपल्या रक्तगटाचा अवयव मिळेपर्यंत वाट बघावी लागते. मग वेगवेगळ्या NGO कडून त्या सर्जरीसाठी पैशाची जमवाजमव करावी लागते. एकूणच सगळं खूप प्रेशरचं काम असतं. वेळेत अवयव मिळाला तर ठीक, नाहीतर… या सगळ्या गोष्टी बघून मनात नेहमी प्रश्न यायचे. आपण कशी मदत करु शकतो? आपला कसा उपयोग होईल? मग 2013 साली माहिती काढली आणि सरळ जाऊन नाव नोंदवलं. हो, आता मी ऑर्गन डोनर आहे आणि आज इंटरनॅशनल ऑर्गन डोनर डेला माझ्यासारख्या असंख्य डोनर्सना आजच्या दिवसाच्या शुभेच्छा. हो, शुभेच्छाच! कारण आपण गेल्यावर आपल्या आवयवांमुळे कोणाचं तरी आयुष्य खूप पॉझिटिव्हली बदलेल.’

हे सुद्धा वाचा

‘माहितीसाठी- ब्रेन डेड झाल्यानंतर दान करता येणाऱ्या अवयवांमध्ये हृदय, आतडे, मूत्रपिंड, यकृत, फुफ्फुस, स्वादुपिंड आणि डोळे यांचा समावेश होतो आणि मी अभिमानाने सांगू शकते की मी हे सर्व दान केले आहेत. यासाठी वयाची मर्यादा नाही. तुम्ही तुमच्या जवळच्या रुग्णालयांशी संपर्क साधू शकता किंवा ZTCC गुगलवर तुम्ही केंद्रांबद्दल माहिती मिळवू शकता’, अशी पोस्ट तिने लिहिली आहे.

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री तेजश्री प्रधाननेही नेत्रदान केल्याची माहिती दिली होती. जुईच्या या निर्णयाचं तिचे चाहते आणि कलाविश्वातील तिचे मित्रमैत्रिणी कौतुक करत आहेत.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.