कार्डियक अरेस्टनंतर प्रसिद्ध अभिनेता कोमामध्ये; प्रकृती चिंताजनक
कलाकारांसह चाहते चिंतेत... 'या' अभिनेत्याची प्रकृती चिंताजनक; त्याच्या भेटीसाठी कुटुंब आणि अनेक कलाकार रुग्णालयात दाखल
मुंबई : ज्यूनियर एनटीआर याचा भाऊ आणि अभिनेता नंदमुरी तारक रत्न यांची प्रकृती सध्या गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. अभिनेत्याला नुकताच पदयात्रे दरम्यान कार्डियक अरेस्ट आला. कार्डियक अरेस्ट आल्यानंतर अभिनेत्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आता तारक रत्न यांच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. तारक रत्न कार्डियक अरेस्टनंतर कोमामध्ये असल्याचं सांगण्यात येत आहे. आता अभिनेत्याला भेटण्यासाठी अनेक कलाकार आणि कुटुंबातील सदस्यांनी रुग्णालयात गर्दी केली आहे. एवढंच नाही तर, अनेक राजकारणी मंडळी देखील अभिनेत्याची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात पोहोचल्याचं सांगण्यात येत आहे.
तारकरत्न यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे चाहते सोशल मीडियाच्या माध्यामातून अभिनेत्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत आहेत. ट्विटरवर देखील तारक रत्न ट्रेंड होत आहे. कुटुंबातील सदस्य बंगळूरू येथील रुग्णालयात पोहोचले आहेत. महत्त्वाचं म्हणजे ज्यूनियर एनटीआर आणि कल्याण राम यांच्या कुटुंबातील सदस्य देखील तारक रत्न यांची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात पोहोचले आहेत.
दरम्यान, तारक रत्न यांचा भाऊ नंदामुरी चैतन्य कृष्णा यांनी अभिनेत्याच्या प्रकृतीची माहिती माध्यमांना दिली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तारक रत्न यांची अद्याप प्रकृती अजूनही गंभीर आहे. ते कोमात आहेत. त्यामुळे तारक रत्न यांच्या कुटुंबाला आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्याच्या प्रकृतीबद्दल चर्चा रंगत आहे.
सांगायचं झालं तर, नंदामुरी तारकरत्न ‘आरआरआर’ फेम अभिनेता ज्यूनिअर एनटीआर आणि कल्याण राम यांचे चुलत भाऊ आहेत. एवढंच नाही तर, तारकरत्न आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री नंदामुरी तारका रामाराव यांचे नातू आहे. म्हणून तारकरत्न यांच्या प्रकृतीबद्दल प्रत्येक जण चिंता व्यक्त करत आहे.
तारक रत्न (Taraka Ratna) आणि भाऊ नारा लोकेश दोघे एका रॅलीमध्ये पोहोचले होते. पदयात्रेदरम्यान तारक रत्न अचानक बेशुद्ध पडले. गर्दीमुळे त्यांचा श्वास गुदमरल्याचं सांगण्यात येत आहे. जेव्हा तारक रत्न यांना रुग्णालयत दाखल करण्यात आलं , तेव्हा अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. सध्या प्रत्येक जण अभिनेत्याच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत आहेत.