‘हिंसा फक्त शारीरिकच नाही तर…’, लग्न तुटल्यानंतर प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आयुष्यात दुखःचा डोंगर
'समाजाची पर्वा मी कधीच केली नाही,कायद्याची मदत घेतली आणि...', पहिल्या पतीच्या जाचाला कंटाळलेल्या प्रसिद्ध अभिनेत्रीने 'त्या' नात्यावर सोडलं मौन
मुंबई | बॉलिवूडमधून अनेक चांगल्या वाईट गोष्टी समोर येत असतात. खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यात येणाऱ्या अडचणी सेलिब्रिटी मोकळेपणाने चाहत्यांसोबत शेअर करतात. झगमगत्या विश्वात ब्रेकअप, भांडण, वाद यांसारख्या गोष्टी कायम चर्चेत असतात. पण लग्नानंतर काही अभिनेत्रींना त्यांच्या वैवाहिक आयुष्यात अनेक संकटांचा सामना करावा लागला. अभिनेत्री शेफाली जरिवाला हिच्या वैवाहिक आयुष्यात देखील अनेक चढ – उतार आले. ‘बिग बॉस १३’ची दमदार स्पर्धक आणि ‘कांटा लगा गर्ल’ अभिनेत्री शेफाली जरिवाला हिला २००२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कांटा लगा’ गाण्यातून प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यानंतर अभिनेत्रीने हरमीत सिंग याच्यासोबत लग्न केलं. पण अभिनेत्रीचं नातं फार काळ टिकलं नाही…
पती-पत्नीच्या नात्यात अनेक वाद निर्माण झाल्यामुळे अभिनेत्रीने २००९ साली घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आणि अभिनेत्री हरमीत सिंग याच्यापासून वेगळी झाली. लग्नाच्या पाच वर्षांनंतर हरमीत सिंग आणि शेफाली यांचे मार्ग वेगळे झाले. त्यानंतर २०१४ साली शेफाली हिने टीव्ही अभिनेता पराग त्यागी याच्यासोबत लग्न केलं. पहिलं लग्न अपयशी ठरल्यानंतर अभिनेत्री आता पराग याच्यासोबत आनंदी वैवाहिक आयुष्य जगत आहे. सोशल मीडियावर दोघांचे फोटो देखील तुफान व्हायरल होत असतात.
पहिल्या लग्नाबद्दल शेफाली म्हणाली, ‘तुमचं कौतुक केलं जात आहे की नाही, हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे… कोणतीही हिंसा फक्त शारीरिकच असू शकत नाही.. मानसिक हिंसा देखील होते आणि ज्याचा प्रचंड त्रास होतो. ज्यामुळे आपण कायम दुःखी राहतो.’ असं देखील शेफाली म्हणाली…
अभिनेत्री पुढे म्हणाली, ‘मी स्वतःचे पैसे कमवत असल्यामुळे मला निर्णय घेण्यासाठी वेळ लागला नाही… माझे आई – वडील माझ्यासोबत होते.. ज्याप्रकारे माझ्यावर संस्कार करण्यात आले आहे, ज्यामुळे मी समाजाची पर्वा कधीच केली नाही. कायद्याची मदत घेतली आणि मझ्या मनाला जे पटलं तेव्हा मी ते केलं… ‘ असं अभिनेत्री म्हणाली..
शेफाली आता दुसऱ्या पतीसोबत आनंदी आयुष्य जगत आहे. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर शेफालीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. ‘मुझसे शादी करोगी’ सिनेमाात महत्त्वाची भूमिका साकारल्यानंतर देखील शेफाली तुफान चर्चेत आली. सोशल मीडियावर शेफाली कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते… शेफाली तिच्या रोजच्या महत्त्वाच्या घडामोडी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करत असते.