तुझा बॉयफ्रेंड 4 वर्षांनी मोठा..; ‘एक था टायगर’च्या दिग्दर्शकाने सांगितला कतरिना-सलमानचा किस्सा

'न्यूयॉर्क' या चित्रपटाच्या वेळी सलमान आणि कतरिना एकमेकांना डेट करत होते. तर 'एक था टायगर' या चित्रपटाच्या शूटिंगच्या आधीच दोघांचा ब्रेकअप झाला होता. त्यावेळी दोघं एकमेकांसोबत अजिबात कम्फर्टेबल नव्हते, असं कबीरने सांगितलं.

तुझा बॉयफ्रेंड 4 वर्षांनी मोठा..; 'एक था टायगर'च्या दिग्दर्शकाने सांगितला कतरिना-सलमानचा किस्सा
दिग्दर्शक कबीर खान, अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता सलमान खानImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 29, 2024 | 12:24 PM

दिग्दर्शक कबीर खान हा अभिनेता सलमान खान आणि कतरिना कैफ यांचा जवळचा मित्रसुद्धा आहे. ज्यावेळी सलमान आणि कतरिना एकमेकांना डेट करत होते, तेव्हापासून कबीर या दोघांना ओळखतो. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कबीरने कतरिनाविषयीची एक किस्सा सांगितला. सलमानमुळे कतरिना कबीरच्या ‘न्यूयॉर्क’ चित्रपटात भूमिका साकारण्यासाठी तयार झाली होती. जेव्हा तिने या चित्रपटाची कथा ऐकली, तेव्हा तिला ती फारशी आवडली नव्हती. यशराज फिल्म्स बॅनरअंतर्गत हा तिचा पहिलाच चित्रपट होता. त्यामुळे तिला लव्ह स्टोरी, गाणी, डान्स अशा प्रकारच्या स्क्रिप्टची अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात तिचा भ्रमनिरास झाला होता.

सलमानमुळे कतरिनाने साइन केला चित्रपट

याविषयी कबीरने सांगितलं, “त्यावेळी ती सलमान खानला डेट करत होती. मला भेटल्यानंतर सलमानने तिला विचारलं की मिटींग कशी झाली? ती त्याला म्हणाली, एक नवीन दिग्दर्शक आहे, ज्याने याआधी एक चित्रपट बनवला होता आणि त्याने मला एक ऑफर दिली आहे. पण त्यात काम करायचं की नाही याबद्दल मी संभ्रमात आहे. हे ऐकून सलमानने तिला दिग्दर्शकाचं नाव विचारलं. तेव्हा तिने सांगितलं, की कबीर खान असं त्याचं नाव आहे. तेव्हा सलमान तिला म्हणाला की डोळे बंद करून तू हा चित्रपट साइन कर. मी त्याला भेटलोय. कतरिनाने मला हा किस्सा बऱ्याच वर्षांनंतर सांगितला. माझी आणि सलमानची पहिली भेट ‘काबुल एक्स्प्रेस’च्या शूटिंगदरम्यान झाली होती. पण ती छोटी भेटसुद्धा सलमानने लक्षात ठेवली होती.”

कतरिना-सलमानचा किस्सा

कबीर खान दिग्दर्शित ‘न्यूयॉर्क’ या चित्रपटात नील नितीन मुकेश आणि जॉन अब्राहम यांच्याही मुख्य भूमिका होत्या. यासाठी त्यांनी न्यूयॉर्कमध्ये 100 दिवसांत शूटिंग पूर्ण केलं होतं. कतरिनासाठी हा संपूर्ण नवीन अनुभव होता. “ती जेव्हा सेटवर यायची, तेव्हा मला सर म्हणून हाक मारायची. अखेर मला तिला बोलावं लागलं की, यार तुझा बॉयफ्रेंड माझ्यापेक्षा चार वर्षांनी मोठा आहे. कृपया तू मला सर बोलू नकोस.”

हे सुद्धा वाचा

शूटिंगदरम्यानचा एक मजेशीर किस्सासुद्धा कबीर खानने यावेळी सांगितला. “शूटिंगचे पहिले 20 दिवस मी कतरिनाला चुकून करीना म्हणूनच हाक मारत होतो. जेव्हा माझी तिच्याशी चांगली मैत्री झाली, तेव्हा मी तिला बरोबर कतरिना या नावाने हाक मारू लागलो. नंतर बजरंगी भाईजान या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान मी करीनाला चुकून कतरिना म्हणून हाक मारू लागलो होतो”, असं तो हसत सांगतो. कबीर खान आणि कतरिना यांच्यात अजूनही चांगली मैत्री आहे. विकी कौशल आणि कतरिनाच्या लग्नाला कबीर त्याच्या पत्नीसोबत आवर्जून उपस्थित होता.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.