Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कच्चा बादामवरचे ठुमके तर बघा; भोजपुरी अभिनेत्री आम्रपालीचा इन्स्टावरचा व्हिडिओ व्हायरल

आम्रपाली या अभिनेत्रीने गोदी में सुताके या गाण्यावर डान्स करताना एक व्हिडिओ शेअर केला होता. आणि तो व्हिडिओही लाखो लोकांनी पाहिला होता. या व्हिडिओबरोबरच तिच्या डान्सचे अनेक व्हिडिओ तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत

कच्चा बादामवरचे ठुमके तर बघा; भोजपुरी अभिनेत्री आम्रपालीचा इन्स्टावरचा व्हिडिओ व्हायरल
Follow us
| Updated on: Feb 11, 2022 | 7:38 PM

मुंबईः आम्रपाली दुबे म्हणजे भोजपुरी चित्रपटातील एक गाजलेली अभिनेत्री. आम्रपालीने भोजपुरी (Amrapali Dubey) चित्रपटाबरोबरच तिने हिंदी मालिकांमधूनही (Hindi Serial) कामं केली आहेत. तिचे हे प्रोजेक्ट सुरू असतानाच ती सोशल मीडियावरही (Social Media) प्रचंड अॅक्टिव्ह असते. ती इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन अनेक प्रकारचे व्हिडिओही ती पोस्ट करत असते. सध्या तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एका व्हिडिओ शेअर केला आहे. सध्या बहुचर्चित असलेलं आणि सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेलं कच्चा बादाम गाण्यावर ती डान्स करताना दिसत आहे. हे गाणं सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आहे.

या गाण्यामुळे अनेक लोकांनी ठेका धरला आहे. हे बंगाली गाणं सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि या गाण्यावर सेलिब्रेटी लोकंही ठेका धरत आहेत. असाच एक व्हिडिओ अभिनेत्री आम्रपाली दुबेंनीही डान्स करुन आपल्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरून शेअर केला आहे.

आम्रपालीच्या डान्सवर यूजर्स फिदा

या गाण्यावर ती डान्स करताना तिने पर्पल रंगांची साडी नेसून ती डान्स केला आहे. या व्हिडिओमध्ये तिच्या सोबत कोरिओग्राफर एम. के. गुप्ता जॉय हा ही डान्स करताना दिसत आहे. या गाण्यावर त्यांनी केलेल्या स्टेप यूजर्सना आवडू लागल्या आहेत. आणि या गाण्यावर डान्स करताना दोघांची मस्त केमिस्ट्रीही जुळून आली आहे. कच्चा बादाम या गाण्याचा व्हिडिओ पोस्ट करताना तिने दिनेश लाल यादव यालाही टॅग केला आहे. या व्हिडिओमुळे आम्रपालीचं सोशल मीडियावर प्रचंड कौतूक होत आहे. तर 80 हजारपेक्षा जास्त या त्यांच्या डान्सला लाईक्स मिळाल्या आहेत.

प्रेमाची कबुली दोघांकडूनही नाही

याआधीही आम्रपाली या अभिनेत्रीने गोदी में सुताके या गाण्यावर डान्स करताना एक व्हिडिओ शेअर केला होता. आणि तो व्हिडिओही लाखो लोकांनी पाहिला होता. या व्हिडिओबरोबरच तिच्या डान्सचे अनेक व्हिडिओ तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत ते तुम्ही बघू शकता. आम्रपाली आणि निरहुआबरोबर असलेल्या त्यांच्या प्रेमाच्या अनेक गोष्टीही आता चर्चेत येऊ लागली आहेत. मात्र दोघांपैकी एकानही एकमेकांच्या प्रेमाची कबूली लोकांसमोर दिली नाही, मात्र तरीही त्यांच्या प्रेमाची गोष्ट सगळ्यांनाच माहिती आहे.

संबंधित बातम्या

माझं जर चुकत असेल तर बरोबर करा म्हणत कंगनाला शबाना आझमीनी दिलं उत्तर…

Madhuri Dixit Photos : माधुरी दिक्षितचे फोटो पाहून तुमचंही मन धकधक करायला लागेल, फोटो एकदा बघाच…

प्रसिद्ध दिग्दर्शक रवि टंडन यांचं निधन; रविनाची वडिलांसाठी भावूक पोस्ट, म्हणाली, “आप हमेशा मेरे साथ चलेंगे पापा…”