अक्षय कुमारच्या मुलासोबत काजोल हिची लेक, ऑरी ‘तो’ फोटो पोस्ट करत म्हणाला…
Nysa Devgn Aarav Bhatia : अक्षय कुमार याचा मुलगा आणि काजोल हिची मुलगी याच्यांत खास कनेक्शन, ऑरी दोघांचा 'तो' फोटो पोस्ट करत म्हणाला..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सेलिब्रिटी किड्सची चर्चा... फोटो तुफान व्हायरल...
झगमगत्या विश्वातील अनेक गोष्टी कायम चाहत्यांमध्ये चर्चेत असतात. पण गेल्या काही दिवसांपासून सेलिब्रिटी किड्सची चर्चा सर्वत्र तुफान रंगलेली असते. सोशल मीडियावर स्टारकिड्सचे फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल होत असतात. आता देखील सर्वत्र स्टारकिड्सची चर्चा रंगलेली असते. आता अभिनेता अक्षय कुमार याचा मुलगा आरव भाटिया आणि अभिनेत्री काजोल हिची मुलगी निसा देवगन यांचा एका फोटो व्हायरल होत आहे. दोघांचा फोटो ऑरी याने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.
ऑरी बॉलिवूड सेलिब्रिटींचा खास मित्र आहे. अनेक स्टारकिड्ससोबत ऑरी याची मैत्री आहे. ऑरी कायम बॉलिवूड सेलिब्रिटींसोबत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असतो. आता देखील ऑरी काजोल आणि अक्षय यांच्या मुलांसोबत पार्टी करताना दिसला. स्टारकिड्सची पार्टी भारतात नाहीतर, सातासमुद्रा पार युरोप याठिकाणी रंगली होती.
ऑरी याने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये निसा, आरव यांच्यासोबत दुसरे मित्र देखील आहेत. अजय देवगन-काजोल यांची मुलगी नीसा देवगन, अक्षय कुमार-ट्विंकल खन्ना यांचा मुलगा आरव आणि अहान शेट्टी यांची एक्स गर्लफ्रेंड तानिया श्रॉफ देखील फोटोमध्ये दिसत आहे.
View this post on Instagram
स्टारकिड्स ऑरी याच्यासोबत दमदार पार्टी करताना दिसत आहेत. फोटोमध्ये चारही जण आनंदाने पार्टी करताना दिसत आहेत. फोटो पोस्ट करत ऑरी म्हणाला, ‘जर तुम्ही सतत लाजत राहाल तर, कधीच जीवनाचा आनंद घेऊ शकत नाही…’ सध्या सर्वत्र ऑरी याने पोस्ट केलेल्या फोटोंची चर्चा रंगली आहे.
View this post on Instagram
ऑरी याच्याबद्दल सांगायचं झालं तर, ओरहान अवात्रामणी उर्फ ऑरी सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय झालेल्यांपैकी एक आहे. कोणत्याही सेलिब्रिटीने पार्टी किंवा इतर कोणत्या गोष्टीचं आयोजन केसं असेल तर ऑरी त्याठिकाणी असतोच… शिवाय सेलिब्रिटींसोबत स्वतःच्या सिग्नेचर पोजमध्ये काढत असलेल्या फोटोंमुळे देखील ऑरी कायम चर्चेत असतो. सोशल मीडियावर ऑरीचे फोटो आणि व्हिडीओ देखील तुफान व्हायरल होत असतात.