इतरांना प्रसाद वाढताना असं कोण करतं? काजोलच्या व्हिडीओवर भडकले नेटकरी

अभिनेत्री काजोलचा दुर्गा पूजेदरम्यानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये काजोल पंगतीत बसलेल्यांना जेवण वाढताना दिसून येत आहे. मात्र जेवण वाढताना तिच्याकडून झालेली चूक पाहून नेटकरी भडकले आहेत.

इतरांना प्रसाद वाढताना असं कोण करतं? काजोलच्या व्हिडीओवर भडकले नेटकरी
Kajol and her son YugImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Oct 11, 2024 | 12:45 PM

दरवर्षी नवरात्रीत बॉलिवूडमधल्या काही ठराविक सेलिब्रिटींकडून दुर्गा पूजेचं आयोजन केलं जातं. यासाठी मुंबईत दुर्गा पुजेसाठी मोठा मंडप बांधला जातो. अभिनेत्री राणी मुखर्जी, काजोल, जया बच्चन, सुमोना चक्रवर्ती, तनिषा मुखर्जी हे सर्व या पूजेला आवर्जून उपस्थित असतात. पारंपरिक पोशाखात या अभिनेत्री दुर्गा पूजेत सहभागी होतात, मनोभावे देवीची पूजा करतात, गुलाल उधळतात आणि भक्तांना जेवणही वाढतात. दुर्गा पुजेनंतर भक्तांसाठी प्रसादाचं आयोजन केलं जातं. हा प्रसाद स्वत: काजोल, राणी मुखर्जी हे सेलिब्रिटी भक्तांना वाढतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये काजोल पंगतीत बसलेल्यांना जेवण वाढताना दिसून येत आहे. मात्र तिच्या एका कृतीने नेटकऱ्यांना फारच राग आला आहे.

पंगतीत बसलेल्यांना जेवण वाढत असतानाच काजोल स्वत:सुद्धा खात होती. यामुळेच नेटकऱ्यांना तिचा राग आला आहे. प्रसाद वाढताना कोण स्वत: खातं, असा सवाल नेटकऱ्यांनी केला आहे. काजोलच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘ही जेवण वाढताना स्वत:च का खातेय? उद्धट बाई’, असं एका युजरने लिहिलंय. तर ‘ही चांगली सवय नाही. दुसऱ्यांना जेवण वाढताना स्वत: खाऊ नये’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘काजोल ज्या पद्धतीने वागतेय, तिचा स्वभाव, तिचा राग हे सर्व पाहून चुकीचं वाटतंय’, असंही नेटकऱ्यांनी लिहिलं आहे.

हे सुद्धा वाचा

सांताक्रूझमधील नॉर्थ बॉम्बे सर्बोजनीन दुर्गा पूजा पंडालमधील हा व्हिडीओ आहे. या पंडालमधील दुर्गा पूजेसाठी अभिनेता रणबीर कपूर, जया बच्चन आणि राणी मुखर्जीसुद्धा आली होती. यावेळी पंगतीत बसलेल्यांना प्रसाद वाढताना एक व्यक्ती फोनमधील कॅमेरा चालू करून काजोलचा व्हिडीओ शूट करत असते. त्या व्यक्तीला काजोल लगेचच व्हिडीओ शूट न करण्याचा इशारा करते. आपण काहीतरी खातोय, असं हाताने इशारा करत ती त्या व्यक्तीला व्हिडीओ शूट बंद करण्यास सांगते. यानंतर काजोलच्या मागे उभा असलेला एक व्यक्तीसुद्धा तिचा व्हिडीओ शूट न करण्याची विनंती करतो.

दुर्गा पूजादरम्यानचे काजोलचे इतरही काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यापैकी काही व्हिडीओमध्ये ती लोकांना ओरडताना आणि त्यांच्यावर चिडताना दिसत आहे. एका व्हिडीओमध्ये काजोल आणि जया बच्चन यांच्यातील खास नातंही पहायला मिळालं. दोघी एकमेकांसोबत गप्पांमध्ये रमलेल्या दिसून आल्या. त्या व्हिडीओवरही चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.

सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.