आता नाटक बंद कर अन्..; चाहत्यासोबत काजोलचा उद्धटपणा? नेटकऱ्यांकडून प्रचंड ट्रोल

अभिनेत्री काजोलविषयीची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. या पोस्टमध्ये एका चाहतीने तिच्यावर आरोप केले आहेत. आपल्या भावाशी काजोल उद्धटपणे वागल्याचं म्हणत तिने रेस्टॉरंटमधील किस्सा सांगितला आहे.

आता नाटक बंद कर अन्..; चाहत्यासोबत काजोलचा उद्धटपणा? नेटकऱ्यांकडून प्रचंड ट्रोल
KajolImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 30, 2024 | 10:01 AM

अभिनेत्री काजोलने तिच्या आजवरच्या करिअरमध्ये अनेक दमदार भूमिका साकारल्या आहेत. काजोल तिच्या बिनधास्त आणि बेधडक स्वभावामुळेही ओळखली जाते. सध्या काजोल सोशल मीडियावर तिच्या याच स्वभावामुळे चर्चेत आली आहे. एका चाहतीने तिच्यावर उद्धटपणे वागल्याचा आरोप केला आहे. काजोलविषयी या चाहतीने सोशल मीडियावर मोठी पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये तिने आरोप केलाय की, काजोल तिच्या ऑटिस्टिक भावाशी चुकीच्या पद्धतीने वागली. कॅमेरामागे काजोलचा खरा स्वभाव कसा आहे, ती लोकांसोबत कशी वागते, याविषयीही तिने लिहिलं आहे. चाहतीने लिहिलेली पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. त्यावरून नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत.

नेमकं काय घडलं?

‘रेडिट’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर संबंधित युजरने लिहिलं, ‘मी माझ्या भावावर खूप प्रेम करते. तो मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असून त्याच्या आयुष्यातील हा कठीण काळ आहे. मुंबईतल्या जुहूमधील एका रेस्टॉरंटमध्ये त्याला काही लोकांच्या मदतीने नोकरी मिळाली आणि तो यामुळे खूप खुश होता. गेल्या काही महिन्यांपासून तो तिथे काम करतोय. तो काजोलचा खूप मोठा चाहता आहे. त्याने ‘दिलवाले दुल्हनियाँ ले जाएंगे’, ‘माय नेम इज खान’ ही तिची चित्रपटं अनेकदा पाहिली आहेत. योगायोगाने तो जिथे काम करतो, त्याच रेस्टॉरंटमध्ये काजोल तिच्या मित्रमैत्रिणींसोबत पोहोचली होती. माझ्या भावाने तिथलं पूर्ण काम केलं, डिनर सर्व्ह केलं आणि त्यानंतर बिल घेऊन काजोलजवळ गेला. माझ्या भावाला काजोलला शुभेच्छा द्यायच्या होत्या आणि हेच सांगायचं होतं की तो तिचा खूप मोठा चाहता आहे.’

काजोलवर टीका

या पोस्टमध्ये तिने पुढे लिहिलं, ‘माझा भाऊ काजोलला पाहून इतका खुश झाला होता की तो तिच्यासमोर रडू लागला होता. मात्र काजोल त्याला उद्धटपणे म्हणाली, “झालं का? आता नाटक बंद कर आणि बिल घेऊन ये.” इतकंच नव्हे तर तिने माझ्या भावाची तक्रार रेस्टॉरंटच्या मॅनेजरकडे केली. काजोल, मी तुला मनापासून शुभेच्छा देते. तू साधं धन्यवाद पण बोलू शकत नाही. तू जेवताना त्याने तुला रोखलं नव्हतं किंवा तुमच्या गप्पांदरम्यान तो मधे आला नव्हता.’

हे सुद्धा वाचा

सोशल मीडियावर काजोलबद्दलची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘बॉलिवूडची सर्वांत असभ्य अभिनेत्री’. असं एकाने लिहिलं. तर ‘हे सेलिब्रिटी फक्त नावाला सेलिब्रिटी असतात’, असं दुसऱ्याने म्हटलंय. या पोस्टवर अद्याप काजोलकडून कोणतीच प्रतिक्रिया समोर आली नाही.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.