Kajol | अजय देवगन याच्यासोबत लग्नाआधी ‘या’ पुरुषाला डेट करायची काजोल

Kajol | अभिनेत्री काजोल हिच्या लग्नापू्र्वीच्या रिलेशनशिपबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे, कोण होता 'तो' पुरुष ज्याला अभिनेत्री करायाची डेट..? अभिनेत्रीच्या नात्याची सर्वत्र चर्चा

Kajol | अजय देवगन याच्यासोबत लग्नाआधी 'या' पुरुषाला डेट करायची काजोल
Follow us
| Updated on: Sep 10, 2023 | 2:14 PM

मुंबई : 9 सप्टेंबर 2023 | अभिनेत्री काजोल आणि अभिनेता अजय देवगन आता त्यांच्या खासगी आयुष्यात प्रचंड आनंदी आहेत. काजोल सोशल मीडियावर देखील अजय आणि कुटुंबावर असलेलं प्रेम व्यक्त करत असते. एवढंच नाही तर, कुटुंबाबद्दल अनेक गोष्टी देखील अभिनेत्री चाहत्यांना सांगत असते. बॉलिवूडचं एक परफेक्ट कपल म्हणून काजोल आणि अजय देवगन यांची ओळख आहे. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर अजय आणि काजोल यांनी लग्नाचा निर्णय घेतला. दोघांच्या जोडीला देखील चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. पण अजय याच्यासोबत लग्न करण्याआधी काजोल अन्य पुरुषाला डेट करत होती. सध्या सर्वत्र काजोल आणि तिच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.

काजोल हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्वतःचं नशीब आजमावताना दिसत आहे. अजय देवगन देखील पत्नीच्या आगामी सिनेमांबद्दल अनेक गोष्टी सांगत असतो. ‘गुंडाराज’ सिनेमाच्या शुटिंग दरम्यान अजय आणि काजोल यांच्यामध्ये प्रेम बहरलं. अनेक वर्ष दोघांनी एकमेकांना डेट केलं.

अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर अजय आणि काजोल यांनी २४ फेब्रुवारी १९९९ मध्ये लग्न केलं. दोघांच्या लग्नाची गोष्ट सर्वत्र कळल्यानंतर चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला. पण अजय याच्यासोबत लग्न करण्याआधी काजोल तिच्या एका मित्राला डेट करत होती. या गोष्टीचा खुलासा खुद्द अभिनेत्रीने एका मुलाखतीत केला होता.

हे सुद्धा वाचा

अजय याच्यासोबत लग्न करण्याआधी काजोल मित्र कार्तिक मेहता याला डेट करत होती. एवढंच नाही तर, लग्नाआधी अभिनेत्री अजय याच्याकडून डेटींग टिप्स घ्यायची. पण कार्तिक मेहता याच्यासोबत असलेलं अभिनेत्रीचं नातं अधिक काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. सध्या सर्वत्र काजोल हिच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री काजोल हिने एक मोठा काळ बॉलिवूडमध्ये गाजवला आहे. काजोल हिने आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट सिनेमे बॉलिवूडला दिले आहेत. आता अभिनेत्री बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर काजोल हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.