कदाचित तेव्हा ते माझा..; काजोलचा मुलांविषयी खुलासा, सांगितलं चकीत करणारं कारण
Kajol: 'कदाचित तेव्हा ते माझा...', सर्वांसमोर स्वतःच्याच मुलांबद्दल असं का बोलून गेली काजोल, कसं आहे मुलांसोबत नातं? अभिनेत्रीने सांगितलं चकीत करणारं कारण..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त काजोल हिच्या वक्तव्याची चर्चा.

Kajol: ‘दिलवाले दुल्हनियां ले जाएंगे’, ‘कुछ कुछ होता है’ आणि ‘गुप्त’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत अभिनेत्री काजोल हिने चाहत्यांचं मनोरंजन केलं. आता काजोल पूर्वीप्रमाणे बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, काही सिनेमांच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येत असते. आजही काजोल हिची चाहत्यांमध्ये क्रेझ पाहायला मिळते. तर अनेकांच्या प्रेरणास्थानी काजोल आहे. असंख्य चाहते आजही अभिनेत्रीचा आदर करतात. पण काजलच्या मुलांना आईच्या कामाचा कोणताच गर्व आणि आदर नाही. यावर खुद्द अभिनेत्रीने मोठं वक्तव्य केलं आहे.
नुकताच झालेल्या एका कार्यक्रमात काजोल म्हणाली, ‘मी माझी फिल्मोग्राफी पाहात होती. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेक की सर्वात कमी काम करणारी अभिनेत्री मी आहे. मी कदाचित 50 सिनेमांमध्ये काम केलं असेल.’ पुढे काजलला तिच्या मुलांबद्दल विचारण्यात आलं.
‘मुलं कधी तुला विचारत नाहीत की, इतकी मोठी स्टार आहेस, तर काम का करतेस?’ असा प्रश्न काजोल हिला विचारण्यात आला. यावर अभिनेत्री म्हणाली, माझ्या घरी उटल परिस्थिती आहे… असं काजोल म्हणाली. सध्या सर्वत्र काजोल हिच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.




अभिनेत्री म्हणाली, ‘माझ्या घरी परिस्थिती वेगळी आहे. माझी मुलं मला म्हणतात, तू घरात का नाही बसत. तुला बाहेर जायची काय गरज आहे? दुसऱ्यांची आई बघ, शाळेत सोडायला येते, पार्टीमध्ये येते…’ यावर काजोल मुलांना म्हणते, ‘मला घरी बसायचं नाही. मी माझ्या कामात आनंदी आहे. मी विचार करते माझी मुलं मोठी झाल्यानंतर तरी माझा आदर करतील… फक्त त्यांनी लवकर मोठं व्हावं हिच आशा आहे…’ सांगायचं झालं तर, काजोल आणि अभिनेता अजय देवगण यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. त्यांच्या मुलीचं नाव निसा आणि मुलाचं नाव युग असं आहे.
काजोल हिची दोन्ही मुलं सध्या शिक्षण घेत आहेत. पण निसा हिला अनेकदा पार्ट्यांमध्ये स्पॉट केलं जातं. तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अनेकदा निसाला हिले ट्रोल देखील करण्यात येतं.
निसा कोणत्या क्षेत्रात करणार करीयर?
निसा तिच्या आईवडिलांप्रमाणेच अभिनय क्षेत्रात काम करणार का, या प्रश्नावर अजयने एका मुलाखतीत सांगितलं होतं, “तिला या क्षेत्रात यायचंय की नाही हे मला माहीत नाही. सध्या तरी तिने अभिनयक्षेत्रात काही रस दाखवला नाही. पण तिचे विचार कधीही बदलू शकतात. ती सध्या परदेशी असून शिक्षणावर लक्ष केंद्रीत करतेय.” असं देखील अभिनेता म्हणाला होता.