Kajol | शाहरुख खान याला फोन करताना काजोल ‘या’ कारणामुळे घाबरते, अभिनेत्रीचा मोठा खुलासा
बाॅलिवूड अभिनेत्री काजोल हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका या केल्या आहेत. विशेष म्हणजे काजोल आणि शाहरुख खान यांची जोडी हिट ठरलीये. शाहरुख खान आणि काजोल यांनी बाॅलिवूडला अनेक हिट चित्रपट दिली आहेत.
मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री काजोल आणि किंग खान अर्थात शाहरुख खान (Shah Rukh Khan) यांनी आतापर्यंत अनेक हिट चित्रपट हे बाॅलिवूडला दिले आहेत. काजोल आणि शाहरुख खान यांची जोडी हिट जोडींपैकी एक आहे. शाहरुख खान याचा काही दिवसांपूर्वीच पठाण हा चित्रपट (Movie) रिलीज झाला आणि या चित्रपटाने तूफान अशी कामगिरी ही बाॅक्स आॅफिसवर केलीये. शाहरुख खान याने पठाण चित्रपटाच्या माध्यमातून तब्बल चार वर्षांनंतर बाॅलिवूडमध्ये (Bollywood) धमाकेदार पध्दतीने पुनरागमन केले आहे. 2019 मध्ये शाहरुख खान याचा झिरो हा चित्रपट रिलीज झाला होता आणि हा चित्रपट फ्लाॅप गेला. हा चित्रपट फ्लाॅप गेल्यापासून शाहरुख खान हा मोठ्या पडद्यापासून दूर गेला. चाहते त्याच्या पुनरागमनाची वाट पाहताना दिसले.
आता नुकताच काजोल हिने शाहरुख खान याच्याबद्दल अत्यंत मोठा खुलासा हा केला आहे. शाहरुख खान याच्याबद्दल बोलताना काजोल ही म्हणाली की, मी शाहरुख खान याला कधीही फोन करू शकते. विशेष म्हणजे शाहरुख खान हा मध्यरात्री देखील माझा काॅल उचणार हे मला पूर्णपणे माहिती आहे.
परंतू मी शाहरुख खान याला फोन करताना नेहमीच घाबरते. मी आणि शाहरुख खान खूप चांगले मित्र आहोत. मात्र, मी त्याला रोजच फोन अजिबात करू शकत नाही. कारण त्याने जर तसेच केले तर अवघड होईल. मी कधीच शाहरुख खान याला गुड माॅर्निंग किंवा काही गुड माॅर्निंगचे फोटो वगैरे नाही पाठवत किंवा तसे करण्याची मला भीती वाटते.
मी जर शाहरुख खान याला रोजच मेसेज करत बसले तर तो मला सोडणार नाही हे नक्की आहे. एक चर्चा बाॅलिवूडमध्ये तूफान रंगली होती की, अजय देवगण याने लग्नानंतर काजोल हिला शाहरुख खान याच्यासोबत काम करण्यास सक्त मनाई ही केली आहे. मात्र, यावर कधीच काजोल हिने तसे भाष्य केले नाही.
एका मुलाखतीमध्ये शाहरुख खान याला याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. काजोल हिने अजय देवगण याने तुमच्यासोबत काम करण्यास मनाई केलीये का? यावर शाहरुख खान म्हणाला होता की, होय मी देखील अशी चर्चा ऐकली आहे. मात्र, याबद्दल मला फार काही माहिती नाही. पण मला वाटते की, अजय देवगण असे काहीही करणार नाही.