Kajol | ‘महिलांची २६ इंच कंबर असेल तर..’, इंडस्ट्रीबद्दल आता स्पष्टच बोलली कजोल
Kajol | इंडस्ट्रीमध्ये कोणती गोष्ट गरजेची? महिलांच्या २६ इंच कंबरेचा उल्लेख करत काजोल स्पष्टच म्हणाली...; गेल्या काही वर्षांपासून काजोल अभिनयापासून दूर आहे.. पण आता अभिनेत्रीने केलेल्या वक्तव्यामुळे सर्वत्र चर्चांना उधाण...काजोल असं म्हणाली तरी काय?
मुंबई | 8 ऑक्टोबर 2023 : इंडस्ट्रीबद्दल अनेक चांगल्या – वाईट गोष्टी चाहत्यांसमोर येत असतात. कधी अभिनेत्रींसोबत होणारा भेदभाव, कास्टिंग काऊच... इत्यादी गोष्टींमुळे बॉलिवूड आणि चाहत्यांध्ये खळबळ माजलेली असते. आता देखील अभिनेत्री काजोल हिच्या वक्तव्यामुळे इंडस्ट्रीबद्दल एक मोठी गोष्ट समोर आली आहे. ज्यामुळे झगमगत्या विश्वातील आणखी एक सत्य समोर आलं आहेत. काजोल हिने अनेक सिनेमांच्या माध्यमातून चाहत्यांच्या मनात घर केलं. चाहत्यांनी देखील अभिनेत्रीला डोक्यावर घेतलं.
‘दिल वाले दुल्हनिया ले जायेंगे’, ‘कुछ कुछ होता है’, ‘कभी खुशी कभी गम’ यांसारख्या अनेक सिनेमाच्या माध्यमातून काजोल चाहत्यांच्या भेटीस आली. पण गेल्या काही वर्षापासून अभिनेत्री अभिनयापासून दूर होती. पण आताच्या काळात देखील काजोल हिला सिनेमांमध्ये काम करायला आवडत आहे.
काजोल म्हणाली, ‘सध्या मी इंडस्ट्रीमध्ये उत्तम काम करत आहे. दुसऱ्यांचं मला माहिती नाही. पण माझ्याकडे अशा काही भूमिका येत आहेत, ज्या फक्त माझ्यासाठी लिहिण्यात आल्या आहेत.. आताच्या घडीला मला असं वाटतं की, २६ इंच कंबर असण्याची काहीही गरज नाही. मी महिला आणि पुरुषांबद्दल आता हेच सांगेल…’
पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘इंडस्ट्रीमध्ये काम करण्यासाठी आणि लोकप्रियतेसाठी आता सुंदर चेहरा आणि शरीराची गरज नाही.. यासाठी इंडस्ट्रीने एक पाऊल पुढे टाकलं आहे आणि ही गोष्ट अनेकांनी अनुभवली देखील आहे…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली….
इंडस्ट्रीमध्ये काजोलसाठी आता सर्वात महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत? यावर अभिनेत्री म्हणाली, ‘चांगल्या कथेची गरज आहे. जेव्हा मी एखादी कथा ऐकते तेव्हा त्या भूमिकेत मी स्वतःची कल्पना करू शकतो. मला अशी भूमिका करायला आवडणार नाही ज्यात मी स्वतःची कल्पना करू शकत नाही. असं अभिनेत्री म्हणाली..
‘एखाद्या भूमिकेसाठी मी स्वतःची कल्पना करू शकत नाही. तर ती भूमिका करून काय फायदा…ज्यांच्यासोबत मला काम करायला आवडत नाही, मी त्यांच्यासोबत काम करणार नाही. कारण तेव्हा माझा वेळ वाया जात आहे असे मला वाटते. जेव्हा मी स्वतः आनंदी नसेल, तर त्याठिकाणी मी का राहू… मी फक्त माझ्या आवडीच्या लोकांसोबत काम करते. पण भूमिका लहान असेल तर मी करेल… असं देखील अभिनेत्री म्हणाली.. सध्या सर्वत्र काजोल हिची चर्चा रंगली आहे.