Kajol | काजोलच्या ‘त्या’ एका कृत्यावर भडकले चाहते; म्हणाले ‘हा तर चीप पब्लिसिटी स्टंट’

'स्वस्तात मिळवलेली प्रसिद्धी' असं एकाने म्हटलंय. तर 'तुझ्यासाठी मनात असलेला आदरसुद्धा आज संपुष्टात आला' असं दुसऱ्या युजरने लिहिलं आहे. 'काजोलचा मी खूप मोठा फॅन होतो. पण तिच्या अशा वागण्यामुळे मी निराश झालोय' अशा शब्दांत चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Kajol | काजोलच्या 'त्या' एका कृत्यावर भडकले चाहते; म्हणाले 'हा तर चीप पब्लिसिटी स्टंट'
KajolImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jun 11, 2023 | 8:18 AM

मुंबई : अभिनेत्री काजोल सध्या चित्रपटसृष्टीत फारशी सक्रिय नसली तर सोशल मीडियाद्वारे ती सतत चाहत्यांच्या संपर्कात असते. इन्स्टाग्रामवर तिचा मोठा चाहतावर्ग आहे. मात्र शुक्रवारी जेव्हा तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली, तेव्हा सर्वांनाच तिची काळजी वाटू लागली. ‘आयुष्यातील सर्वांत कठीण काळाला सामोरं जात आहे’, अशी पोस्ट लिहित काजोलने सोशल मीडियापासून ब्रेक घेत असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे नेमकं काय झालंय, असा प्रश्न अनेकांना पडला होता. सोशल मीडियावरील या ड्रामानंतर आता जेव्हा तिने तिच्या आगामी चित्रपटाचा पोस्टर शेअर केला, तेव्हा ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली. स्वस्तात प्रसिद्धी मिळवण्यासाठी काजोलने असं केलंय, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी तिच्यावर टीका केली आहे.

काजोलला सोशल मीडियावर जोरदार ट्रोल केलं जातंय. याच ट्रोलिंगदरम्यान सोशल मीडियावर #ShameOnKajolHotstar असा हॅशटॅग ट्रेंड होतोय. शुक्रवारी तिने सोशल मीडियापासून ब्रेक घेत असल्याचं जाहीर केलं होतं. मात्र काही तासांनंतर ती पुन्हा सोशल मीडियावर आली आणि तिच्या आगामी ‘द ट्रायल’ या वेब सीरिजच्या प्रमोशनला सुरुवात केली. ही वेब सीरिज हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. काजोलने तिच्या सीरिजच्या प्रमोशनसाठी जी पद्धत वापरली, त्याचा नेटकऱ्यांना खूप राग येतोय.

हे सुद्धा वाचा

‘स्वस्तात मिळवलेली प्रसिद्धी’ असं एकाने म्हटलंय. तर ‘तुझ्यासाठी मनात असलेला आदरसुद्धा आज संपुष्टात आला’ असं दुसऱ्या युजरने लिहिलं आहे. ‘काजोलचा मी खूप मोठा फॅन होतो. पण तिच्या अशा वागण्यामुळे मी निराश झालोय’ अशा शब्दांत चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. केवळ पब्लिसिटी स्टंटसाठी अशा पद्धतीने खोटे पोस्ट करणं योग्य नाही, असा सल्ला नेटकऱ्यांनी तिला दिला आहे.

View this post on Instagram

A post shared by Kajol Devgan (@kajol)

काजोल लवकरच नेटफ्लिक्सवरील ‘लस्ट स्टोरीज 2’ या अँथॉलॉजी चित्रपटातही झळकणार आहे. सुजॉय घोष, कोंकना सेन शर्मा, आर. बाल्की आणि अमित आर. शर्मा या चार दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केलेल्या विविध कथा या एका चित्रपटात पहायला मिळणार आहेत. 1992 पासून काजोल बॉलिवूड इंडस्ट्रीत काम करतेय. तिने ‘बेखुदी’ या चित्रपटातून पदार्पण केलं. तिची आई तनुजा आणि काकी नुतन यासुद्धा अभिनेत्री आहेत. काजोलचे वडील शोमू मुखर्जी हे दिग्दर्शक आणि निर्माते होते. तर तिची छोटी बहीण तनिषा मुखर्जीसुद्धा अभिनेत्री आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.