सर्जरी नाही केली, तरी गोरी कशी झाली? ट्रोलर्सना काजोलचं स्पष्ट उत्तर

Bollywood actress Kajol: कायम सावळ्या रंगामुळे ट्रोल होणाऱ्या काजोलचं स्पष्ट उत्तर, सर्जरी नाही केली, तरी गोरी कशी झाली? अभिनेत्री म्हणाली..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त काजोल हिने ट्रोलर्सना दिलेल्या उत्तराची चर्चा...

सर्जरी नाही केली, तरी गोरी कशी झाली? ट्रोलर्सना काजोलचं स्पष्ट उत्तर
Follow us
| Updated on: Nov 27, 2024 | 11:54 AM

Bollywood actress Kajol: बॉलिवूडच्या दिग्गज अभिनत्री तनुजा यांनी अनेक हीट सिनेमे बॉलिवूडला दिला. तनुजा यांच्यानंतर लेक काजोल हिने देखील बॉलिवूडवर राज्य केलं. आज काजोल बॉलिवूडपासून दूर असली तरी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. काजोल हिच्या करियरबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने ‘बेखुदी’ सिनेमातून अभिनयास सुरुवात केली. पण ‘बाजीगर’ सिनेमातून अभिनेत्रीच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. त्यानंतर काजोल हिने कधीच मागे वळून पाहिलं नाही.

काजोल हिने अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर आणि बॉलिवूडवर राज्य केलं. पण अभिनेत्रीला आजही तिच्या सावळ्या रंगामुळे ट्रोल केलं जातं. ज्यावर अभिनेत्रीने ट्रोल करणाऱ्यांना स्पष्ट शब्दात उत्तर दिलं आहे. सांगायचं झालं तर, काजोल सोशल मीडियावर कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. अशात कमेंटकर अभिनेत्रीला अनेक जण ट्रोल करत असतात. ‘असं काय केलं, ज्यामुळे तू इतकी गोरी झालीस?’

एका मुलाखतीत काजोल हिने ट्रोलर्सना स्पष्ट शब्दात उत्तर दिलं. अभिनेत्री म्हणाली, ‘या सर्व गोष्टी आता सामान्य झाल्या आहेत आणि याचा मला काहीही फरक पडत नाही…’ त्वचा आणि रंगाबाबत प्रश्न विचारणाऱ्या लोकांना उत्तर देताना अभिनेत्री म्हणाली, तिने तिच्या त्वचेवर कोणतीही शस्त्रक्रिया केलेली नाही. आता ती फक्त सूर्यप्रकाशापासून दूर राहते. त्यामुळे स्किन टॅन होत नाहीत.

हे सुद्धा वाचा

पुढे काजोल म्हणाली, ‘स्किन व्हाइटनिंग सर्जरी नाही, फक्त घरात राहण्याची सर्जरी आहे…’ एवढंच नाही तर, एकदा काजोल सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट करत म्हणाली, ‘त्या सर्वांसाठी जे मला कायम विचारत असतात इतकी गोरी कशी झाली…’ शिवाय अभिनेत्री #sunblocked #spfunbeatable या हॅशटॅगचा देखील वापर केला होता.

काजोल आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अभिनेत्री सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर काजोल हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.