‘ही दुसरी जया बच्चन’,’केसरी चॅप्टर 2′ च्या स्क्रीनिंगदरम्यान काजोल पापाराझींवर चिडली; व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले
'केसरी चॅप्टर 2' च्या स्क्रीनिंगदरम्यानचा काजोलचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये काजोल पापाराझींना झापताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी काजोलला ट्रोल केलं आहे.

अक्षय कुमार, अनन्या पांडे आणि आर माधवन यांच्या ‘केसरी चॅप्टर 2’ या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. हा चित्रपट 18 एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी, एक विशेष स्क्रीनिंग आयोजित करण्यात आलं होतं ज्यामध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली होती. ‘केसरी चॅप्टर 2’च्या स्क्रीनिंगला बॉलिवूडची चुलबुली अभिनेत्री काजोलनेही हजेरी लावली होती. याच स्क्रीनिंगमधील काजोलचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये काजोल पापाराझींवर चिडताना दिसत आहे. काजोलला असे रागावलेले पाहून नेटकऱ्यांनी मात्र तिला चांगलंच ट्रोल केलं आहे.
‘केसरी चॅप्टर 2’ च्या स्क्रीनिंग दरम्यान काजोल पापाराझींवर भडकली
काजोल ‘केसरी चॅप्टर 2’ च्या स्क्रीनिंगला निऑन ग्रीन टाय-डाय रंगाचा सूट घालून आली होती. काजोल स्क्रीनिंगला पोहोचताच ती अनन्या पांडेला भेटली आणि तिच्याशी बोलत असल्याचं दिसत आहे. अनन्याशी बोलत असतानाच ती पापाराझींसाठी पोज देत होती. पण यावेळी पापाराझींनी काजोलचे नाव घेऊन ओरडायला सुरुवात केली. त्यानंतर मात्र रागावली आणि तिने सर्व पापाराझींना झापलं. काजोलच्या चेहऱ्यावर चिडचिड स्पष्टपणे दिसून येतं होती. तिला पापाराझींचे ओरडणे अजिबातच आवडलं नसल्याचं दिसून आलं होतं. ती चिडून “काम डाऊन , काम डाऊन मित्रांनो” असं पापाराझींना म्हणाली.
View this post on Instagram
व्हिडिओ पाहून नेटकरी संतापले
काजोलचा हा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. पण काजोलचं पापाराझींशी असं फटकून वागणं, तिची चिडचिड नेटकऱ्यांन फारसं आवडलं नसल्याचं दिसून आलं. नेटकरी तिची तुलना जया बच्चनशी करत आहेत. एका युजरने लिहिले आहे की ‘ही जयाजी आहे’; तर अजून एकाने लिहिलं “दुसरी जया बच्चन”. काजोलच्या या व्हिडिओवर अनेक कमेंट्स येत आहेत. सर्वजण तिला ट्रोल करत आहेत.
View this post on Instagram
जया बच्चन यांचं नाव घेत नेटकऱ्यांकडून काजोल ट्रोल
‘केसरी चॅप्टर 2’ च्या स्क्रीनिंगबद्दल बोलायचं झालं तर,स्क्रीनिंगला अक्षय कुमार त्याची पत्नी ट्विंकल खन्नासोबत पोहोचला होता. तसेच करण जोहर, राशा थडानी, अवनीत कौर, आर माधवन, बोमन इराणी यांच्यासह अनेक कलाकार स्क्रीनिंगसाठी आले होते. ‘केसरी चॅप्टर 2’चे दिग्दर्शन करण त्यागी यांनी केलं आहे. हा एक कोर्टरूम ड्रामा आहे. ज्यामध्ये जालियनवाला बाग हत्याकांडाचे वर्णन केले आहे. या चित्रपटात अक्षय एका वकिलाच्या भूमिकेत आहे.