Kapil Sharma | ‘कपिल सर्वांसाठी पनवती…’, प्रसिद्ध सेलिब्रिटीने कॉमेडियनवर साधला निशाणा

ट्विट करत बॉलिवूडच्या प्रसिद्ध सेलिब्रिटीने साधला कपिल शर्मा याच्यावर निशाना; अभिनेता कॉमेडियनला पनवती म्हणाला, त्यामागचं कारण जाणून व्हाल हैराण...

Kapil Sharma | 'कपिल सर्वांसाठी पनवती...', प्रसिद्ध सेलिब्रिटीने कॉमेडियनवर साधला निशाणा
Follow us
| Updated on: Jun 21, 2023 | 1:53 PM

मुंबई | कॉमेडियन कपिल शर्मा (Kapil Sharma) कायम त्याच्या ‘द कपिल शर्मा शो’मुळे चर्चेत असतो. कपिलच्या शोला देखील चाहत्यांनी डोक्यावर घेतलं आहे. प्रत्येक बॉलिवूड स्टार सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी ‘द कपिल शर्मा शो’ उत्तम पर्याय समजतो. अभिनेता सलमान खान, आमिर खान, आलिया भट्ट, रणबीर कपूर, अनुष्का शर्मा एवढंच नाही तर, अभिनेत्री ऐश्वर्या राय देखील तिच्या सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी ‘द कपिल शर्मा शो’मध्ये पोहोचली होती. आता अभिनेते सनी देओल आणि अभिनेत्री आमिषा पटेल देखील त्यांच्या आगामी सिनेमाच्या शुटिंगसाठी ”द कपिल शर्मा शो’मध्ये पोहोचणर आहेत. पण सेलिब्रिटी आणि चाहत्यांमध्ये लोकप्रिय असलेला ‘द कपिल शर्मा शो’वर एका प्रसिद्ध अभिनेत्याने निशाणा साधला आहे..

कपिल शर्मा याच्या ‘द कपिल शर्मा शो’वर निशाणा साधणार सेलिब्रिटी दुसरा तिसरा कोणी नसून अभिनेता आणि विश्लेषक केआरके आहे. नुकताच केआरके यांनी ट्विट करत कपिल शर्मा आणि त्याच्या शोवर निशाणा साधला आहे. अभिनेता ट्विट करत म्हणाला, ‘गदर २ सिनेमाची संपूर्ण टीम आज ‘द कपिल शर्मा’ शोमध्ये पोहोचली आहे. ‘गई भैंस पानी में’ आता हा सिनेमासुद्धा ब्लॉकडस्टर होणार” असं म्हणत केआरके याने ‘गदर २’ फ्लॉप होणार असल्याची भविष्यवाणी केली आहे.

हे सुद्धा वाचा

एवढंच नाही तर, दुसऱ्या ट्विटमध्ये केआरके याने कपिल याचा पनवती म्हणून उल्लेख केला आहे.. केआरके म्हणाला, ‘‘द कपिल शर्मा’ शोमध्ये एखाद्या सिनेमाचं प्रमोशन होत असले तर तो सिनेमा फ्लॉप ठरणार असं मी अनेकदा सांगितलं आहे. लोक कपिलच्या फायद्यासाठी त्याचा सिनेमा पाहत नसतील तर इतरांचे सिनेमे का पहतील.. कपिस प्रत्येक सिनेमासाठी पनवती आहे…’ असं देखील केआरके म्हणाला.

दरम्यान, केआरके याने ‘गदर २’ सिनेमाचं प्रमोशन केल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. सध्या सर्वत्र ‘गदर २’ सिनेमाची चर्चा सुरु आहे. अभिनेता सनी देओल आणि अभिनेत्री अमिषा पटेल ‘गदर २’ सिनेमा ११ ऑगस्ट २०२३ रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. ‘गदर २’मध्ये आता तारा सिंग म्हणजेच सनी देओलच्या मुलाची कथा दाखवण्यात येणार आहे. सनी देओलच्या मुलाची भूमिका अभिनेता उत्कर्ष साकारणार आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.