Kamal Haasan: कमल हासन रुग्णालयात दाखल; जाणून घ्या प्रकृतीविषयीचे अपडेट्स..

प्रकृती अस्वास्थ्यामुळे कमल हासन चेन्नईतील रुग्णालयात दाखल; डॉक्टरांनी दिला 'हा' सल्ला

Kamal Haasan: कमल हासन रुग्णालयात दाखल; जाणून घ्या प्रकृतीविषयीचे अपडेट्स..
Kamal HaasanImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Nov 24, 2022 | 8:36 AM

चेन्नई: अभिनेते आणि ‘मक्कल निधी मय्यम’ या पक्षाचे संस्थापक कमल हासन यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. चेन्नईतील श्री रामचंद्र मेडिकल सेंटरमध्ये त्यांना बुधवारी संध्याकाळी दाखल करण्यात आलं. कमल हासन हे रेग्युलर चेक-अपसाठी रुग्णालयात दाखल झाल्याचं कळतंय. कमल हासन हे नुकतेच हैदराबादला गेले होते. तिथे त्यांनी दिग्गज दिग्दर्शक विश्वनाथ यांची भेट घेतली. तिथल्या काही कार्यक्रमांमध्ये सहभागी झाल्यानंतर ते बुधवारी दुपारी चेन्नईला परतले. मात्र संध्याकाळी त्यांना बरं वाटत नसल्याने चेक-अपसाठी रुग्णालयात दाखल झाले.

रेग्युलर चेक-अपनंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल, अशी माहिती आहे. मात्र पुढील काही दिवस पूर्णपणे आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी त्यांना दिला आहे.

कमल हासन गेल्या काही दिवसांपासून ‘इंडियन 2’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहेत. बुधवारी त्यांनी इन्स्टाग्रामवर दिग्दर्शक के. विश्वनाथ यांच्या भेटीचा फोटो पोस्ट केला. कमल हासन त्यांना गुरू मानतात. कमल हासन आणि के. विश्वनाथ यांनी तीन तेलुगू चित्रपटांमध्ये एकत्र काम केलंय.

हे सुद्धा वाचा

कमल हासन यांचा काही दिवसांपूर्वीच ‘विक्रम’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर तुफान प्रतिसाद मिळाला. सध्या ते ‘इंडियन 2’ या तमिळ चित्रपटावर काम करत आहेत.

फेब्रुवारी 2020 मध्ये सेटवरील एका अपघातानंतर ‘इंडियन 2’ या चित्रपटाचं शूटिंग रखडलं होतं. या अपघातात तिघांचा मृत्यू आणि 10 जण जखमी झाले होते. शूटिंगदरम्यान क्रेन पडल्याने ही दुर्घटना झाली होती. जवळपास दोन वर्षांनंतर सप्टेंबरपासून शूटिंगला सुरुवात झाली.

बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.