Happy Birthday Kamal haasan | एकूण दोन लग्न, अफेअर्सची चर्चा, जाणून घ्या अभिनेता कमल हसनच्या खास गोष्टी

कमल हसन यांना ओळखत नाही, असा एकही व्यक्ती सापडणार नाही. त्यांच्या खासगी आयुष्याचीदेखील चांगलीच चर्चा होते. त्यांच्या आयुष्यात प्रेम अनेकवेळा आले. मात्र, ते कोणासोबतही जास्त काळासाठी संसार करू शकले नाहीत. सारिका, गौतमी तसेच तड़ीमल्ला ही तीन नावं त्यांच्या आयुष्यात आली. यामध्ये सारिका यांच्यासोबत कमल हसन यांचे नाते 13 वर्षापर्यंत टिकले.

Happy Birthday Kamal haasan | एकूण दोन लग्न, अफेअर्सची चर्चा, जाणून घ्या अभिनेता कमल हसनच्या खास गोष्टी
kamal haasan
Follow us
| Updated on: Nov 07, 2021 | 8:30 AM

मुंबई : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी तसेच बॉलिवडूमध्येदेखील आपल्या अभिनयाच्या जोरावर दबदबा निर्माण करणारे अभिनेता कमल हसन यांचा आज वाढदिवस. त्यांचा जन्म 7 नोव्हेंबर 1954 रोजी झाला. कमल  फक्त एक अभिनेता नसून एक अष्टपैलूव्यक्तिमत्व आहे. अभिनयासोबतच दिग्दर्शक, पटकथा लेखक, निर्माता, पार्श्वगायक अशी अनेक क्षेत्रात त्यांनी खुबीने काम केले आहे. सिनेसृष्टीत कमल हसन हे नाव त्यांच्यात असलेल्या कलेमुळे जेवढे परिचित आहे, तेवढीच चर्चा त्यांच्या आयुष्याचीदेखील होते.

कमल हसन यांची दोन लग्ने, अफेअर्स

कमल हसन यांनी 1975 मध्ये ‘अपूर्वा रागांगल’ या चित्रपटाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. तसेच पुढे ‘मूंद्रम पिराई’ या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यांच्या या यशानंतर त्यांच्या करिअरचा ग्राफ वर चढत गेला. कमल हसन यांना ओळखत नाही, असा एकही व्यक्ती सापडणार नाही. त्यांच्या खासगी आयुष्याचीदेखील चांगलीच चर्चा होते. त्यांच्या आयुष्यात प्रेम अनेकवेळा आले. मात्र, ते कोणासोबतही जास्त काळासाठी संसार करू शकले नाहीत. सारिका, गौतमी तसेच तड़ीमल्ला ही तीन नावं त्यांच्या आयुष्यात आली. यामध्ये सारिका यांच्यासोबत कमल हसन यांचे नाते 13 वर्षापर्यंत टिकले.

24 वर्षांनी मोठ्या असलेल्या वाणी गणपती यांच्याशी केलं लग्न

कमल हसन यांनी सर्वात अगोदर 1978 मध्ये वाणी गणपती यांच्याशी लग्न केलं. वाणी त्याच्यापेक्षा 24 वर्षांनी मोठी होती. हे नातं फार काळ टिकलं नाही. नंतर दहा वर्षांनी दोघांनीही घटस्फोट घेतला. वाणी यांच्यापासून वेगळे होण्यामागे सारिकाच कारणीभूत असल्याचे बोलले जाते. अभिनेत्री सारिकाची यांचे चित्रपटसृष्टीमध्ये पदापर्ण झाल्यानंतर कमल हसन यांच्या आयुष्यातदेखील सारिका यांनी प्रवेश केला होता. त्यानंतर कमल हसन वाणी यांच्यापासून वेगळा झाला होते. पुढे कमल हसन आणि सारिका अनके दिवस लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होते. यादरम्यान सारिका गरोदर राहिली होती. त्यानंतर कमल हसनने तिच्याशी लग्न केले. सारिका यांनी श्रुती हासनला जन्म दिला. आज श्रुती मोठी अभिनेत्री आहे. त्यांची दुसरी मुलगी अक्षरा हसन हीदेखील एक अभिनेत्री आहे.

सिमरन बग्गा हिला डेट केले

आगामी काळात कमल हसन आणि सारिका यांच्यातील नाते फार काळ टिकले नाही. त्यांनी 2002 मध्ये घटस्फोट घेतला. या दोन लग्नांव्यतिरिक्त कमल हसन यांचे दोन अफेअर्स होते. कमल हसन यांनी त्यांच्यापेक्षा 22 वर्षांनी लहान असलेली अभिनेत्री सिमरन बग्गा हिला डेट केले होते. मात्र, सिमरनने आपल्या बालपणीच्या मित्राशी लग्न केले आणि त्यानंतर हे नाते संपुष्टात आले.

इतर बातम्या :

पंजाबमध्ये अक्षय कुमारच्या सूर्यवंशीला विरोध, किसान मोर्चाचं आक्रमक रुप, शो बंद पाडले

Special Report on Jai Bhim Movie : ‘जय भीम’चाच बोलबाला, आयएमडीबी रेटिंग ते के. चंद्रूपर्यंत चित्रपटाबद्दल कधीही समोर न आलेल्या गोष्टी

सूर्यवंशीमधल्या निहारिकाचे बोल्ड फोटो, नेटकऱ्यांकडून लाईक्स कमेंट्सचा वर्षाव!

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.