दोन लग्न, तीन Girlfriend; २२ वर्ष लहान अभिनेत्रीसोबत रिलेशनशिपमध्ये असूनही ‘हा’ अभिनेता जगतोय एकटं आयुष्य

विवाहाआधी अभिनेता झाला एका मुलीचा बाबा... दोन लग्न अपयशी तर, तीन अभिनेत्रींसोबत ब्रेकअप... सर्वकाही असूनही अभिनेता आज जगतोय एकटं आयुष्य

दोन लग्न, तीन Girlfriend; २२ वर्ष लहान अभिनेत्रीसोबत रिलेशनशिपमध्ये असूनही 'हा' अभिनेता जगतोय एकटं आयुष्य
Follow us
| Updated on: Feb 15, 2023 | 4:26 PM

Kamal Haasan Love story : बॉलिवूडमध्ये कायम चर्चेत राहणारी गोष्ट म्हणजे मैत्री, प्रेम, लग्न, घटस्फोट… (bollywood love) काही सेलिब्रिटींकडे आज सर्वकाही आहे पण एक पार्टनर नाही… अशाच अभिनेत्यांपैकी एक म्हणजे कमल हासन (kamal haasan). साऊथचे सुपरस्टार अभिनेते म्हणून कमल हासन यांची ओळख आहे. त्यांनी आतापर्यंत अनेक एकापेक्षा एक सिनेमांमध्ये काम केलं. फक्त साऊथच नाहीतर, हिंदी सिनेमांमध्ये वेग-वेगळ्या भूमिका साकारत त्यांनी चित्रपटसृष्टीत एक आपली वेगळी ओळख निर्माण केली. दाक्षिणात्य आणि हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाने एकापेक्षा एक सिनेमे आपल्या नावावर करणाऱ्या कमल हासन यांनी दिग्दर्शक, पटकथा लेखक, निर्माता, पार्श्वगायक यामध्ये देखील मोलाची कामगिरी केली. (love story)

सिनेविश्वात त्यांच्या कामाचं कौतुक आणि चर्चा तर कायम होत राहिली. पण त्यांचं खासगी आयुष्य देखील तुफान चर्चेत आलं. लग्नाआधील कमल हासन एका मुलीचे वडील झाले. त्यानंतर त्यांनी लग्न केलं. पण पहिलं आणि दुसरं लग्न देखील त्यांचं अपयशी ठरलं. त्यानंतर तीन अभिनेत्रींसोबत कमल यांचं नाव जोडण्यात आलं.

कमल हासन यांची लव्हलाईफ कायम चर्चेत राहिली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कमल हासन त्यांच्या आयुष्यात आतापर्यंत पाच महिलांसोबत रिलेशनशिपमध्ये होते. 1970 च्या दशकात अभिनेत्री श्रीविद्यासोबत यांच्यासोबत कमल हासन यांनी अनेक सिनेमांमध्ये काम केलं. दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा देखील तुफान रंगल्या. मात्र त्यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. (sarika kamal haasan wife)

हे सुद्धा वाचा

श्रीविद्यासोबत यांच्यासोबत असलेलं नातं तुटल्यानंतर कमल हासन यांनी 1978 मध्ये वाणी गणपतीशी लग्न केले आणि 10 वर्षानंतर दोघेही वेगळे झाले. वाणीपासून घटस्फोट घेतल्यानंतर कमल हासन यांचं नाव अभिनेत्री सारिका यांच्यासोबत जोडलं गेलं. रिपोर्ट्सनुसार, दोघेही लग्नाआधीच एका मुलीचे म्हणजे श्रुती हसनचे पालक झाले. लग्नानंतर कमल हसन आणि सारिका यांच्या घरी आणखी एका मुलीचा जन्म झाला. त्यांच्या दुसऱ्या मुलीचं नाव अक्षरा हासन आहे. (affairs relationships)

कमल हासन आणि सारिका याचं नातंही फार काळ टिकलं नाही आणि 2004 मध्ये दोघेही वेगळे झाले. पण दोघांच्या नात्याची चर्चा तुफान रंगली. लग्नाव्यतिरिक्त कमल हासन त्याच्या अफेअर्समुळेही प्रचंड चर्चेत राहिले. कमल हासन यांचं नाव 22 वर्षांनी लहान असलेल्या सिमरन बग्गासोबतही जोडण्यात आलं. याशिवाय कमल हासन 13 वर्षे अभिनेत्री गौतमीसोबत लिव्ह-इनमध्ये होते आणि 2016 मध्ये वेगळे झाले.

आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी.
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?.
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?.
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.