‘तिचा फ्लॅट सोडून प्रत्येक फ्लॅटमध्ये…’, दिव्या भारती हिच्या मृत्यूचं सत्य अनेक वर्षांनंतर समोर
Divya Bharti death reason | दिव्या भारती हिची हत्या की आत्महत्या? अनेक वर्षांनंतर अखेर सत्य समोर आलंच, 'तिचा फ्लॅट सोडून प्रत्येक फ्लॅटमध्ये...', आजही चाहते अभिनेत्रीला विसरु शकलेले नाही. 5 एप्रिल 1993 रोजी दिव्या भारती हिच्या निधनाची बातमी समोर आली आणि बॉलिवूडमध्ये एकच खळबळ माजली.... कसं झालं अभिनेत्रीचं निधन?
दिवगंत अभिनेत्री दिव्या भारती हिला अद्यापही कोणी विसरु शकलेलं नाही… 5 एप्रिल 1993 बॉलिवूडसाठी काळा दिवस ठरल, कारण याच दिवशी दिव्या हिने अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 19 व्या वर्षी दिव्या भारती हिचं तिच्या फ्लॅटच्या बालकनीतून पडून निधन झालं. तिच्या निधनानंतर सर्वत्र खळबळ माजली होती. दिव्या हिचं निधन बालकनीतून पडून नाहीतर, अभिनेत्रीला कोणी धक्का दिला आहे… असा दावा करण्यात आला. तिची हत्या करण्यात आली आहे… अशा चर्चांनी देखील जोर धरला होता. दरम्यान, अनेक वर्षांनंतर अभिनेते कमल सदाना यांनी अभिनेत्रीच्या निधनाबाबत मोठा खुलासा केला आहे.
दिव्या भारती हिचं निधन एक अपघात होता.. तिच्या मृत्यूच्या तीन दिवसांपूर्वी दिव्या हिच्यासोबत काम करत असल्याचा खुलासा देखील कमल सदाना यांनी केला. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत कमल सदाना यांनी दिव्या भारती हिच्या निधनाबद्दल मोठा खुलासा केला आहे.
कमल सदाना म्हणाले, ‘दिव्या भारती हिच्याकडे अनेक सिनेमे होते. ती आज पुढची सुपरस्टार असती… तेव्हा तिने जास्त ड्रिंक केली होती. इकडे – तिकडे फिरत होती. नशेत दिव्या बालकनीतून खाली पडली असं मला वाटतं… तो फक्त एक अपघात होता. तिच्या मृत्यूच्याच्या काही दिवस आधी आम्ही एकत्र शुटिंग करत होतो आणि तेव्हा सर्वकाही ठिक होतं… तिच्या सोबत काही वाईट घडत नव्हतं… तिच्याकडे एकापेक्षा एक सिनेमे होते… तिने अनेक सिनेमे साईन देखील केले होते…’ असं देखील कमल सदाना म्हणाले.
दिव्या भारती हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने ‘विश्वात्मा’, ‘शोला और शबनम’ आणि ‘दीवाना’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण जेव्हा अभिनेत्रीचं निधन झाले तेव्हा, दिव्या हिची आत्महत्या नसून हत्या असल्याचा दावा अनेकांनी केला. अभिनेत्रीच्या वडिलांनी देखील तिच्या निधनावर मोठं वक्तव्य केलं होतं.
दिव्या भारती हिचे वडील म्हणाले होते, ‘दिव्या भारती हिचं निधन एक अपघात आहे. आत्महत्या, हत्या असं काहीही नाही… तिने जास्त नशा केली होती. ती निराश नव्हती. तुम्हाला अडचणीत टाकेल अशी दिव्या होती… बालकनीमध्ये ती टोकाला बसली होती.. तिचं स्वतःचं वरचं नियंत्रण सुटल्यामुळे ती खाली पडली. खंत एकाच गोष्टीची आहे आणि ती म्हणजे तिचा फ्लॅट सोडून इतर सर्व फ्लॅटना ग्रील होत्या… खाली कायम गाड्या उभ्या असायच्या. पण तेव्हा एकही गाडी उभी नव्हती त्यामुळे दिव्या जमिनीवर पडली… ‘ असं दिव्या भारती हिचे वडील अभिनेत्रीच्या निधनानंतर म्हणाले होते.