Karan Johar | गोव्याच्या सौंदर्याचे नुकसान केल्याचा आरोप; करण जोहरच्या टीमवर कंगना रनौत संतापली
चित्रपट निर्माते करण जोहर यांची धर्मा प्रोडक्शन ही कंपनी सध्या वादात आहे. गोव्यातील नेरुळ या छोट्याशा गावात चित्रपटाचे शूटिंग सुरू होते. त्याठिकाणी प्लास्टिकच्या काही प्लेट, चमचे आणि इतर प्लास्टिक कचरा आणि वापरलेल्या पीपीई किट गावातील परिसरात फेकून देण्यात आल्या आहेत.
मुंबई : चित्रपट निर्माते करण जोहर यांची धर्मा प्रोडक्शन ही कंपनी सध्या वादात आहे. गोव्यातील नेरुळ या छोट्याशा गावात चित्रपटाचे शूटिंग सुरू होते. त्याठिकाणी प्लास्टिकच्या काही प्लेट, चमचे आणि इतर प्लास्टिक कचरा आणि वापरलेल्या पीपीई किट गावातील परिसरात फेकून देण्यात आल्या आहेत. हे गाव गोव्याची राजधानी पणजीपासून दहा किलोमीटर अंतरावर आहे. गावात टाकण्यात आलेल्या कचऱ्यामुळे येथील रहिवाश्यांकडून रोष व्यक्त केला जात आहे. आता या वादात अभिनेत्री कंगना रनौतनेही उडी घेतली असून चित्रपटसृष्टीचा पर्यावरणाला धोका असल्याचे कंगना रनौतने म्हटले आहे. शकुन बत्रा यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेल्या या चित्रपटात दीपिका पादुकोण आणि सिद्धांत चतुर्वेदी काम करत आहेत.( Kangana Ranaut angered to Karan Johar’s team)
Movie industry is not a virus just for the moral fibre n culture of this nation but it has become very destructive and harmful for the environment also, @PrakashJavdekar ji @moefcc see this disgusting,filthy,irresponsible behaviour by so called big production houses, pls help ? https://t.co/EZfzrIWz06
— Kangana Ranaut (@KanganaTeam) October 27, 2020
कंगना रनौतने ट्विटमध्ये म्हटले आहे की, चित्रपट उद्योग हा देशाच्या संस्कृती आणि नैतिकतेसाठी केवळ एक विषाणू नाही, तर आता हा उद्योग पर्यावरणासाठीही अत्यंत धोकादायक बनला आहे. त्यानंतर कंगना पुढे म्हणते, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर कृपया या बड्या प्रोडक्शन हाऊसची बेजबाबदार वागणूक पहा आणि यावर कारवाई करा. कंगना आणखी एक ट्विट करत म्हणाली की, ‘ही असंवेदनशीलता आणि विसंगत वृत्ती अतिशय निराशाजनक आहे. फिल्म युनिट्समध्ये महिला सुरक्षा, आधुनिक पर्यावरणीय ठराव, चांगल्या वैद्यकीय सुविधा आणि कामगारांना चांगले अन्न मिळावे, या संदर्भात कठोर नियमांची आवश्यकता आहे. या बाबींची तपासणी करण्यासाठी शासनाने एक स्वतंत्र विभाग निर्माण केला पाहिजे. गोव्यातील पर्यावरण संर्वधन कार्यकत्यांनी या घडलेल्या प्रकरणाबद्दल करण जोहरला माफी मागण्याचे आवाहन केले आहे. करण जोहरने या प्रकरणात माफी मागितली नाही, तर करण जोहरच्या मुंबई कार्यालयात हा कचरा पाठवण्याची धमकीही त्यांनी दिली आहे. पर्यावरण संर्वधनमधील एक कार्यकर्ता म्हणतो की, हा कचरा जुहू, लोखंडवाला किंवा वर्सोवामध्ये अशा मोकळ्या जागी टाकण्याची हिंमत करू शकते का? जर असे झाले तर या वरून त्याठिकाणी किती मोठ्या प्रमाणात हंगामा होऊ शकतो. रस्त्यावर कचरा टाकणे हा गुन्हा आहे. आणि गोव्याच्या स्थानिक कायद्यांनुसार कुठेही कचरा टाकणे प्रतिबंधित आहे.
संबंधित बातम्या :
Karan Johar | ड्रग्ज प्रकरणातून करण जोहरला ‘क्लीन चीट’, फॉरेन्सिक लॅबकडून ‘हा’ दावा!
करण जोहरच्या पार्टी व्हिडीओमुळे ड्रग्ज प्रकरणात खळबळ, बडे अभिनेते रडारवर
(Kangana Ranaut angered to Karan Johar’s team)