Kangana Ranaut : कंगना रनौत लोकसभा लढणार, राजकारणातील एन्ट्रीचे दिले संकेत, कुठून लढणार?

Kangana Ranaut : कायम वादाच्या भोवऱ्यात राहणारी अभिनेत्री लढणार निवडणूक? अभिनेत्रीने एक मोठं वक्तव्य केलं आणि सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त कंगना रनौत आणि तिच्या राजकारणातील प्रवेशाची चर्चा...

Kangana Ranaut : कंगना रनौत लोकसभा लढणार, राजकारणातील एन्ट्रीचे दिले संकेत, कुठून लढणार?
Follow us
| Updated on: Nov 03, 2023 | 10:42 AM

मुंबई | 3 नोव्हेंबर 2023 : अभिनेता कंगना रनौत (Kangana Ranaut) कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्रीने एक मोठं वक्तव्य केलं आणि सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. यावेळी कंगना हिने राजकारणातील एन्ट्रीचे संकेत दिले आहेत. ‘तेजस’ सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर अभिनेत्री गुजरात येथील द्वारका मंदिरात पोहोचली होती. अभिनेत्री देवाचे दर्शन घेतले आणि माध्यमांसोबत संवात साधला. कंगना हिने राजकारणातील प्रवेशाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. ‘जर श्री कृष्णाची कृपा असले तर लोकसभा निवडणूक लढवेल…’ असं अभिनेत्री म्हणाली आहे… सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त कंगना हिची चर्चा रंगली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून कंगना राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. अखेर अभिनेत्रीने राजकारणातील प्रवेशाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. पण अभिनेत्री कोणत्या भागातून निवडणूक लढवेल याबद्दल माहिती मिळाली नाही. पण अभिनेत्री कायम राजकारणावर देखील स्वतःचं परखड मत मांडत असते.

अभिनेत्री म्हणाली, ‘द्वारका नगरी फार दिव्य आहे. येथील प्रत्येक गोष्ट अद्भुत आहे. माझ्या हृदयात द्वारकाधीश आहेत. द्वारकाधीशांचं दर्शन झाल्यानंतर मला प्रसन्न वाटतं. द्वारकाधीशचं दर्शन घेण्यासाठी नेहमी येथे येण्याचा प्रयत्न करते, पण ते शक्य होत नाही. सरकारने अशी सुविधा द्यावी की ज्यामुळे पाण्याखाली असलेली द्वारका पाण्यात जावून पाहाता येवू शकेल… भगवान श्रीकृष्णाची नगरी आपल्यासाठी स्वर्गापेक्षा कमी नाही.’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.

राम मंदिरवर काय म्हणाली कंगना रनौत

राम मंदिरबद्दल कंगना म्हणाली, ‘600 वर्षांच्या संघर्षानंतर राम यांचा जन्म दिवस भारतीय वर्षात साजरा करण्याचा भाजप सरकारचा मानस आहे. मोठ्या थाटामाटात मंदिराची पुनर्स्थापना करू…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली. सध्या कंगना फक्त आणि फक्त राजकारणात होणाऱ्या तिच्या एन्ट्रीच्या चर्चांमुळे चर्चेत आहे.

कंगनाचे सिनेमे

कंगना हिचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘तेजस’ सिनेमा फ्लॉप ठरला. सध्या अभिनेत्रीचा प्रत्येक सिनेमा फ्लॉप ठरत आहे. कंगना लवकरच ‘इमर्जन्सी’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.  ‘इमर्जन्सी’ सिनेमात कंगना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे.  सध्या सर्वत्र सिनेमाची चर्चा रंगत आहे. शिवाय ‘तनू वेड्स मनू’ सिनेमाचा तिसरा भाग चाहत्यांच्या भेटीस येणार असल्याची चर्चा रंगत आसते…

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.