‘रस्त्यावर एकत्र चालतो तेव्हा…’ कंगना रनौत हिच्यासोबत दिसणारा ‘मिस्ट्री मॅन’ कोण?

Kangana Ranaut : कंगना रनौत हिच्यासोबत दिसणारा 'मिस्ट्री मॅन' कोण? खुद्द अभिनेत्री सांगितलं सत्य, म्हणाली, 'रस्त्यावर एकत्र चालतो तेव्हा...', सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त कंगना रनौत हिच्या वक्तव्याची चर्चा...

'रस्त्यावर एकत्र चालतो तेव्हा...' कंगना रनौत हिच्यासोबत  दिसणारा 'मिस्ट्री मॅन' कोण?
Follow us
| Updated on: Jan 15, 2024 | 12:21 PM

मुंबई | 15 जानेवारी 2024 : अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) गेल्या काही दिवसांपासून खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. कंगना हिला एका परदेशी व्यक्तीसोबत स्पॉट करण्यात आलं होतं. परदेशी व्यक्तीसोबत स्पॉट कंगना हिच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगू लागल्या. आता व्हायरल व्हिडीओमध्ये कंगना हिच्यासोबत दिसलेला ‘मिस्ट्री मॅन’ कोण होता? यावर खुद्द कंगना हिने मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त कंगना आणि तिच्यासोबत दिसणाऱ्या ‘मिस्ट्री मॅन’ची चर्चा रंगली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून कंगना हिने सत्य सांगितलं आहे.

अभिनेत्री म्हणाली, ‘त्या ‘मिस्ट्री मॅन’बद्दल मला अनेक फोन आणि मेसेज येत आहेत. ज्याच्यासोबत मी सलॉन बाहेर फिरताना दिसली. आता संपूर्ण बॉलिवूड, पापाराझी चर्चा करत आहेत आणि त्यांच्या मतानुसार काहीही बोलत आहेत. एक मुलगा आणि मुलगी रस्त्यावर फिरत आहेत, याचा अर्थ ते रिलेशनशिपमध्ये असतील असं होत नाही…’

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by yogen shah (@yogenshah_s)

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘रस्त्यावर एकत्र चालणारे मुलगा – मुलगी भाऊ – बहीण असू शकतात. एकाच कुटुंबातील सदस्य असू शकतात. एकाच कार्यालयात काम करणारे कर्मचारी असू शकतात.. असं अभिनेत्री म्हणाली. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त कंगना हिची चर्चा रंगली आहे.

कंगना कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. एवढंचन नाही तर, कायम वादाचा मुकूट आपल्या डोक्यावर मिरवणारी कंगना अनेकदा वादाच्या भोवऱ्यात देखील अडकली आहे. कंगना सोशल मीडियावर कायम कोणत्या न कोणत्या मुद्द्यावर स्वतःचं मत मांडत असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

कंगना रनौत हिचे आगामी सिनेमे

अभिनेत्री कंगना रनौत ‘इमरजेन्सी’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात कंगना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमा सुरुवातील नोव्हेंबर 2023 मध्ये प्रदर्शित होणार होता. पण आता सिनेमा 2024 मध्ये प्रदर्शित होणार असल्याची माहिती समोर येत आहे. नेमात कंगना रनौत हिच्यासोबत, श्रेयस तळपदे, अनुपम खेर, दिवंगत अभिनेते सतीश कौशिक आणि अभिनेत्री महिमा चौधरी मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.