Kangana Ranaut ला इंग्रजी भाषेवरुन हिणवणं सोनम कपूर हिला पडलं महागात, म्हणाली, ‘गॉसिप करणाऱ्या काकू…”

बॉलिवूड, अभिनेत्रींचं उच्च शिक्षण आणि चांगल्या संस्कारात वाढलेल्या काकू... कंगनाने स्टारकिड सोनम कपूर हिच्यावर साधला निशाणा... 'तो' व्हिडीओ पोस्ट करत कंगना म्हणाली....

Kangana Ranaut ला इंग्रजी भाषेवरुन हिणवणं सोनम कपूर हिला पडलं महागात, म्हणाली, 'गॉसिप करणाऱ्या काकू...''
Follow us
| Updated on: Jul 12, 2023 | 1:46 PM

मुंबई | अभिनेत्री कंगना रनौत कायम कोणत्या न कोणत्या वादग्रस्त कारणामुळे चर्चेत असते. आता देखील कंगनाने अभिनेत्री सोनम कपूर हिच्यावर निशाणा साधला आहे. इंग्रजी इंग्रजी भाषेवरुन हिणवल्यामुळे कंगनाने सोमन कपूर हिचा उल्लेख संस्कारी काकू म्हणून केला आहे. कंगना रनौत हिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. दिग्दर्शक करण जोहर याच्या ‘कॉफी विथ करण’ शोमधील एक व्हिडीओ कंगनाने इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. ज्यामध्ये सोनम कपूर कंगनाच्या इंग्रजीची खिल्ली उडवताना दिसत आहे.

व्हिडीओमध्ये करण विचारतो, ‘तुझ्याकडे सेलिब्रिटींसोबत फ्लुएंट इंग्रजी बोलण्यासाठी एखादी शक्ती असेल, तर तू त्या शक्तीचा वापर कोणासाठी करशील.’ करण याने प्रश्न विचारल्यानंतर सोमन कंगनाचं नाव घेते. पण स्वतःची बाजू सावरत सोनम कंगनाच्या फॅशन सेन्सचं कौतुक करु लागते…

‘कॉफी विथ करण’ शोमधील एक व्हिडीओ शेअर करत कंगना हिने सोनम आणि करण जोहर यांच्यावर निशाणा साधला आहे. कंगना म्हणते, चित्रपटमाफियाबरोबर इतक्या वर्षांच्या लढाईत मी काय कमावलं आहे? यापुढे कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीला इंग्रजी भाषेवरुन हिणवलं जाणार नाही… असं तर शो आता बंद झाला आहे..’

हे सुद्धा वाचा

पुढे कंगना म्हणाली, ‘मी शेवटी जे सडेतोड उत्तर दिलं आहे, ते नक्की बघा.. वयाच्या २४ व्या वर्षी मला धमकावलं, माझा अपमान केला, खिल्ली उडवली. तरी देखील मी शांत आणि नम्रपणे उत्तर दिलं. पण चांगलं शिक्षण घेतलेल्या चांगल्या संस्करात वाढलेल्या, गॉसिप करणाऱ्या काकू कधी असं करु शकत नाहीत..’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.

वादाचा मुकूट कायम आपल्या डोक्यावर घेवून मिरवणारी अभिनेत्री कंगना रनौत कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अभिनेत्री अनेक मुद्द्यांवर स्वतःची स्पष्ट भूमिका मांडत असते. ज्यामुळे तिला वादग्रस्त परिस्थितीचा सामना देखील करावा लागतो.

कधी अभिनेत्री सेलिब्रिटींच्या बाजूने बोलते, तर कधी अनेकांना विरोध देखील करते. आता कंगनाने सोनम कपूर, करण जोहर यांच्यावर निशाणा साधला आहे. सोशल मीडियावर कंगना कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

कंगनाच्या आगामी सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर अभिनेत्री लवकरच ‘इमरजेंसी’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. शिवाय कंगना ‘तोजस’ सिनेमात देखील महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. तेजस सिनेमा  २० ऑक्टोबर २०२३ रोजी प्रदर्शित होणर आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.