स्वत:ला म्हटलं होतं ड्रग ॲडिक्ट.. कंगना यांचा वक्तव्यावरून घुमजाव, इन्स्टाग्रामवर व्हिडीओ मात्र तसाच

लॉकडाऊनच्या काळात कंगना यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यात त्यांनी ड्रग्जचं सेवन केल्याचं म्हटलं होतं. विशेष म्हणजे हा व्हिडीओ अजूनही त्यांच्या अकाऊंटवर पहायला मिळतो.

स्वत:ला म्हटलं होतं ड्रग ॲडिक्ट.. कंगना यांचा वक्तव्यावरून घुमजाव, इन्स्टाग्रामवर व्हिडीओ मात्र तसाच
Kangana RanautImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 01, 2024 | 8:25 AM

अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौत यांचा ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त त्यांनी नुकत्याच काही मुलाखती दिल्या आहेत. या मुलाखतीत त्या बॉलिवूड इंडस्ट्री, राजकारण आणि खासगी आयुष्याविषयीच्या बऱ्याच मुद्द्यांवर मोकळेपणे व्यक्त झाल्या. एका मुलाखतीत कंगना यांना त्यांच्याच एका जुन्या वक्तव्यावरून प्रश्न विचारण्यात आला होता. कंगना यांनी एका जुन्या मुलाखतीत म्हटलं होतं की त्यांनी ड्रग्जचं सेवन केलं होतं. मात्र असं काही वक्तव्य मी केलंच नव्हतं, असं कंगना यांनी या मुलाखतीत म्हटलंय. आश्चर्याची बाब म्हणजे कंगना यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ त्यांच्याच इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेला आहे.

‘द लल्लनटॉप’ला दिलेल्या मुलाखतीत कंगना यांना 2020 मधील त्यांच्या एका वक्तव्यावरून प्रश्न विचारण्यात आला. या मुलाखतीत कंगना यांनी स्वत:ला ‘स्टार आणि ड्रग्ज व्यसनाधीन’ असं म्हटलं होतं. “जेव्हा तुम्ही तुमच्या कुटुंबीयांसोबत राहता, तेव्हा तुम्ही अत्यंत सुरक्षित वातावरणात वावरत असता. पण जेव्हा तुम्ही तुमच्या कुटुंबीयांपासून दूर जाता, तेव्हा तुम्हाला विविध परिस्थितींचा सामना करावा लागतो. तुम्हाला जग पहायचं असतं, योग्य आणि अयोग्य यातील फरक जाणून घेण्यासाठी तुम्ही घर सोडता. जेव्हा तुम्ही मुक्त असता, तेव्हा प्रत्येक सुंदर, वेधक, गडक, चिंताजनक गोष्टींचं तुम्हीला कुतूहल जाणवतं. तुम्ही त्याकडे आकर्षित होता”, असं त्यांनी म्हटलं होतं.

“जेव्हा मी गँगस्टर या चित्रपटात काम करत होते, तेव्हा मी व्यसनाधीनची भूमिका साकारली होती. वो लम्हें या चित्रपटात मी एका अशा व्यक्तीची भूमिका साकारली, जी बायपोलार डिसॉर्डर आणि सिझोफ्रेनियाचा सामना करत असते. फॅशनमध्ये मी जी भूमिका साकारली, तिला कोकेनचं व्यसन असतं. तो माझ्या आयुष्यातील एक टप्पा होता. या गोष्टीला तुम्ही मेथड अँक्टिंग म्हणा किंवा तारुण्य म्हणा.. तो सर्व फक्त अनुभव होता”, असं त्या पुढे म्हणाल्या होत्या.

हे सुद्धा वाचा

“तुम्ही तरुण असता तेव्हा खूप मोकळ्या मनाचे असता. तुम्ही आजची कंगना आणि तिची समजूत पाहिली तर तुम्हाला असं वाटतं का की त्या तरुण कंगनाने जे यश मिळवलं होतं तेच यश ती मिळवू शकेल? मला नाही वाटत. तो गुण आता माझ्यात हरवला आहे. माझ्याकडे आता 16 वर्षांच्या मुलीचा निरागसपणा नाही. मला आता योग्य आणि अयोग्य यातील फरक माहीत आहे. मला आता समजलं की ही रेव्ह पार्टी आहे, त्यात नाही गेलं पाहिजे. पण तरुण कंगनाकडे ती समज नव्हती. म्हणूनच मी आज कंगना राणौत बनले आहे. मी तेव्हा घाबरलेली होते आणि किशोरवयीन म्हणून मी ड्रग्जकडे आकर्षित झाले होते. मी फॅशन या चित्रपटात एका मॉडेलची भूमिका साकारली होती. ड्रग्जचं व्यसन करणाऱ्यांना काय वाटतं, कसं वाटतं हे मला जाणून घ्यायचं होतं. मोठ्या पडद्यावर त्या भावना व्यक्त करण्यासाठी मी काही गोष्टींचा प्रयोग केला होता”, असं कंगना यांनी जुन्या मुलाखतीत म्हटलं होतं. या मुलाखतीचा संदर्भ देत जेव्हा त्यांना विचारण्यात आलं की त्यांनी ड्रग्जचं सेवन केलं होतं का? तेव्हा कंगना यांनी स्वत:च्याच वक्तव्यावरून माघार घेतली. “मी कोणत्याही ड्रग्जचं सेवन केलं नाही, मी फक्त माझं संशोधन, माझा अभ्यास केला. मी लोकांना भेटले आणि त्यांच्याशी बोलले होते”, असं त्यांनी आता म्हटलंय.

“मी ड्रग्जचं सेवन केलं की नाही यावर तुम्ही का अधिक लक्ष केंद्रीत करत आहात? तुम्ही या गोष्टीकडे लक्ष का वेधत नाही की एक 15 वर्षांची मुलगी घर सोडून अभिनय क्षेत्रात आली, तिच्याकडे पैसा आणि प्रसिद्धी होतं, पण तरीही ती व्यसनाधीन, आयटम गर्ल, किंवा उच्चभ्रू वैश्या नाही बनली. जगाला तिला बरंच काही बनवायचं होतं, पण ती अशी बनली जी ती आज आहे,” याकडे कंगना यांनी लक्ष वेधलं.

मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.