‘महिलांना पुरुषांची गरज असते आणि पुरुषांना…’, कंगना रनौत हिच्या पोस्टने वेधलं अनेकांचं लक्ष

Kangana Ranaut : 'महिलांनी पुरुषांची गरज असते आणि पुरुषांना...' महिला आणि पुरुषांबद्दल असं का म्हणाली अभिनेत्री कंगना रनौत? पोस्टमुळे कंगना पुन्हा वादाच्या भोवऱ्यात? सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त कंगना रनौत हिची चर्चा...

'महिलांना पुरुषांची गरज असते आणि पुरुषांना...', कंगना रनौत हिच्या पोस्टने वेधलं अनेकांचं लक्ष
Follow us
| Updated on: Dec 01, 2023 | 11:22 AM

मुंबई | 1 डिसेंबर 2023 : अभिनेत्री कंगना रनौत कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्री एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामुळे अभिनेत्री चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री नीना गुप्ता यांनी फेमिनिज्मवर स्वतःचं मत व्यक्त केलं होतं. ‘स्त्री आणि पुरुष कधीच समान असून शकत नाही.. जेव्हा पुरुष गरोदर राहिल तेव्हा स्त्री – पुरुष समान आहेत…’ असं मी मानेल… असं वक्यव्य नीना गुप्ता यांनी केलं होतं. त्यांच्या वक्तव्यावर अनेकांनी विरोध दर्शवला होता. अनेकांनी नीना गुप्ता यांना ट्रोल देखील केलं होतं. पण अभिनेत्री कंगना हिने नीना यांची बाजू घेत स्त्री – पुरुषांबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

कंगना म्हणाली, ‘नीना गुप्ता यांच्या वक्तव्यावर प्रत्येक जण संताप का व्यक्त करत आहेत? स्त्री आणि पुरुष कधीच समान असू शकत नाही.. महिला आणि पुरुष वेगळे आहेत.. ते वेगळे नाहीत का? फक्त स्त्री – पुरुष नाही तर, आपल्यातील प्रत्येक जण वेगळा आहे. म्हणून देव, गुरु, ज्येष्ठ, आई – वडील एवढंच नाही तर, प्रत्येकाचे साहेब देखील वेगळे आहेत…’

हे सुद्धा वाचा

‘कोणाकडे अनुभव अधिक आहे तर, कोणी अधिक विकसीत आहे. पण आपण कोणत्याच स्तरावर समान नाही.. आपल्याला पुरुषांची गरज आहे? बिलकूल आहे.. जशी महिलांना पुरुषांची गरज असते, त्याच प्रमाणे पुरुषांना देखील महिलांची गरज असते. जर माझ्या आईला तिचं आयुष्य एकटीने जगावं लागलं असतं, तर तिच्या आयुष्यात अनेक अडचणी आल्या असत्या…’

पुढे कंगना म्हणाली, ‘माझे वडील देखील आई शिवाय राहू शकले नसते. मला कळत नाही यामध्ये लाज कसली? महिन्याचे सात दिवस पुरुषांना रक्तस्राव होत नाही… त्यांच्याकडे दैवी शक्ती नाही.. आज महिलांपेक्षा पुरुष अधिक सुरक्षित आहेत. विशेषतः तरुण मुलींसाठी हे सोपे नाही…’ असं देखील कंगना रनौत म्हणाली. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त कंगना रनौत हिच्या पोस्टची चर्चा रंगली आहे.

कंगना रनौत हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री कायम कोणत्याही मुद्द्यावर स्वतःची स्पष्ट भूमिका मांडत असते. अभिनेत्री तिच्या सिनेमांमुळे नाही तर, सडेतोड वक्तव्यांमुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील कंगना कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर कंगना हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

'आदिती यांच्या बापाच्या पापांमुळे...,' शिवसेना आमदाराची खोचक टीका
'आदिती यांच्या बापाच्या पापांमुळे...,' शिवसेना आमदाराची खोचक टीका.
सच्चा शिवसैनिक कसा असतो ते एकनाथ शिंदे यांनी दाखवले - दीपक कसेरकर
सच्चा शिवसैनिक कसा असतो ते एकनाथ शिंदे यांनी दाखवले - दीपक कसेरकर.
पुढील निवडणूका बॅलेटपेपरवर घ्याव्यात, बाळासाहेब थोरात यांची मागणी
पुढील निवडणूका बॅलेटपेपरवर घ्याव्यात, बाळासाहेब थोरात यांची मागणी.
एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेने एनडीएला ताकद, काय म्हणाले बावनकुळे
एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेने एनडीएला ताकद, काय म्हणाले बावनकुळे.
केंद्रात जाणार का ? काय म्हणाले एकनाथ शिंदे
केंद्रात जाणार का ? काय म्हणाले एकनाथ शिंदे.
'मी काल मोदीजींना फोन केला आणि ...,'काय म्हणाले एकनाथ शिंदे
'मी काल मोदीजींना फोन केला आणि ...,'काय म्हणाले एकनाथ शिंदे.
एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार, काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार ?
एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार, काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार ?.
शिंदे यांनी देवेंद्र यांच्यासाठी रस्ता मोकळा करावा - भाजप नेता
शिंदे यांनी देवेंद्र यांच्यासाठी रस्ता मोकळा करावा - भाजप नेता.
'सरकारने आल्यानंतर लाडकी बहिण योजनेत....,' काय म्हणाले अंबादास दानवे
'सरकारने आल्यानंतर लाडकी बहिण योजनेत....,' काय म्हणाले अंबादास दानवे.
... हा मविआच्या नेत्यांचा डांबरटपणा आहे, काय म्हणाले बावणकुळे ?
... हा मविआच्या नेत्यांचा डांबरटपणा आहे, काय म्हणाले बावणकुळे ?.