National Award 2023 Winner | थलायवी चित्रपटाला एकही पुरस्कार नाही, कंगना राणावत हिची मोठी प्रतिक्रिया, म्हणाली…

बाॅलिवूड अभिनेत्री कंगना राणावत ही कायमच चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे. कंगना राणावत ही सोशल मीडियावर देखील नेहमीच सक्रिय दिसते. कंगना राणावत तिच्या पोस्टमुळे बऱ्याच वेळा वादाच्या भोवऱ्यात देखील सापडते. कंगनाची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग सोशल मीडियावर बघायला मिळते.

National Award 2023 Winner | थलायवी चित्रपटाला एकही पुरस्कार नाही, कंगना राणावत हिची मोठी प्रतिक्रिया, म्हणाली...
Follow us
| Updated on: Aug 24, 2023 | 10:02 PM

मुंबई : नुकताच 69 व्या राष्ट्रीय पुरस्कारांच्या (National Award 2023 ) विजेत्यांची घोषणा करण्यात आलीये. या पुरस्कारांमध्ये काही मोजक्याच चित्रपटानी धमाका केल्याचे बघायला मिळाले आहे. विशेष म्हणजे या पुरस्कारामध्ये बाॅलिवूड (Bollywood) आणि साऊथच्या चित्रपटांचा जलवा बघायला मिळत आहे. आपल्या आवडत्या कलाकाराला पुरस्कार मिळाल्याने चाहत्यांमध्ये एक उत्साहाचे वातावरण हे बघायला मिळत आहे. साऊथ स्टार अल्लू अर्जुन याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. कंगना राणावत हिचे नाव देखील या पुरस्कारांमध्ये चर्चेत होते.

काही रिपोर्टनुसार आलिया भट्ट आणि कंगना राणावत यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार हा मिळू शकतो, असे सांगितले जात होते. मात्र, प्रत्यक्षात राष्ट्रीय पुरस्काराच्या यादीमध्ये ना कंगना राणावत हिचे नाव बघायला मिळाले ना तिच्या चित्रपटाला कोणता पुरस्कार मिळाला. यामुळे तिच्या चाहत्यांना मोठा धक्का हा बसला आहे.

कंगना राणावत हिने नुकताच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीये. या पोस्टमध्ये सुरूवातीला कंगना राणावत ही विजेत्यांना शुभेच्छा देताना दिसली आहे. #NationalAward2023 च्या सर्व विजेत्यांचे अभिनंदन… हा एक आनंदोत्सव आहे जो देशभरातील कलाकारांना एकत्र आणतो. सर्व भाषांमध्ये होत असलेल्या अनेक महत्त्वाच्या कामांना जाणून घेणे आणि परिचित होणे खरोखरच मोठी गोष्ट आहे.

माझा थलायवी चित्रपट एकही पुरस्कार जिंकू शकला नाही याबद्दल निराश झालेल्या तुमच्या सर्वांना…मी सांगू इच्छीते की, मला जे कृष्णाने दिले आहे त्याबद्दल मी सदैव कृतज्ञ आहे आणि माझ्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या आणि कौतुक करणाऱ्या सर्वांनीही माझ्या कामाचे कौतुक केले आहे. मला विश्वास आहे की ज्युरींनी सर्वोत्तम कामगिरी केली आहे… मी सर्वांना शुभेच्छा देतो, हरे कृष्णा…

आता कंगना राणावत हिने शेअर केलेली ही पोस्ट तूफान व्हायरल होताना दिसत आहे. चाहते या पोस्टवर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. कंगना राणावत हिला पुरस्कार मिळेल असे सांगितले जात होते. मात्र, अचानक कंगना राणावत हिचा पत्ता कट झाल्याने सर्वांनाच मोठा धक्का हा बसला आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.