व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंनंतर कंगना राणावतचा बाॅलिवूड कलाकारांना टोला, म्हणाली, मी कधीच लग्नात नाचत..

कंगना राणावत ही कायमच चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे. कंगना राणावत हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. कंगना राणावत हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये हिट चित्रपट केले आहेत. सोशल मीडियावरही कंगना राणावत कायमच चर्चेत राहणारे एक नाव आहे.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंनंतर कंगना राणावतचा बाॅलिवूड कलाकारांना टोला, म्हणाली, मी कधीच लग्नात नाचत..
Kangana Ranaut
Follow us
| Updated on: Mar 05, 2024 | 4:41 PM

मुंबई : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे प्री वेडिंग फंक्शन गुजरातमधील जामनगरमध्ये पार पडले. या फंक्शनसाठी फक्त देशच नाही तर विदेशातूनही लोक पोहचले. बाॅलिवूडमधील जवळपास सर्वच स्टार हे या पार्टीमध्ये उपस्थित होते. फक्त उपस्थितच नाही तर धमाकेदार असा डान्स करताना देखील बाॅलिवूड स्टार दिसले. अमिताभ बच्चन यांच्यापासून ते शाहरुख खानपर्यंत जवळपास सर्वचजण या प्री वेडिंग फंक्शनसाठी उपस्थित होते. थेट अमिताभ बच्चन देखील या पार्टीत डान्स करताना दिसले. मात्र, या पार्टीत कुठेही कंगना राणावत ही दिसली नाही.

कंगना राणावत हिने नुकताच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत बाॅलिवूड स्टारचा समाचार घेतलाय. आता कंगना राणावत हिची ही पोस्ट सोशल मीडियवर चांगलीच व्हायरल होताना दिसतंय. अंबानींच्या पार्टीत डान्स करणाऱ्या कलाकारांना चांगलेच खडेबोल सुनावताना कंगना राणावत ही दिसत आहे. विशेष म्हणजे यासोबतच तिने एक मुलाखती शेअर केलीये.

पोस्टसोबत कंगना राणावत हिने लता मंगेशकर यांची एक मुलाखत शेअर केलीये. या मुलाखतीमध्ये लता मंगेशकर यांनी म्हटले की, मला कोणी जरी पाच लाख डॉलर्स दिले तरी मी येणार नाही. या पोस्टमध्ये कंगना राणावत ही आपली आणि लता मंगेशकरची बरोबरी करताना दिसत आहे. कंगना म्हणते की, मला कोणीही करोडो रूपये दिले तरीही मी कोणाच्या कार्यक्रमात परफॉर्म नाही करणार.

कंगना राणावत म्हणते की, मी आयुष्यात खूप आर्थिक संकटातून गेले आहे. लताजी आणि मी असे दोनच व्यक्ती आहोत ज्यांची गाणी खूप हिट आहेत (फॅशन का जलवा, घनी बावली हो गई, लंडन ठुमकदा, साडी गली, विजय भवा) पण तरीही मी लग्नात कधीच नाचले नाही. बऱ्याच प्रसिद्ध आयटम सॉन्गची मला आॅफरही आली. परंतू मी अवॉर्ड शोपासूनच अंतर ठेवले.

आता कंगना राणावत हिची ही पोस्ट सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतंय. लोक या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना देखील दिसत आहेत. अनेकांनी कंगना राणावत योग्यच बोलत असल्याचे देखील म्हटले आहे. अंबानींच्या पार्टीत जवळपास सर्वच बाॅलिवूड कलाकार हे डान्स करताना दिसले. याचे अनेक व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होताना दिसले.

बीडमध्ये हैवानालाही लाजवणारा खून, नव्या एसपी कावत यांच्यापुढे आव्हान
बीडमध्ये हैवानालाही लाजवणारा खून, नव्या एसपी कावत यांच्यापुढे आव्हान.
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.