Kangana Ranaut : कंगना रनौतचं एक पाऊल मागे, मुंबई मनपाविरोधातील खटला मागे
कंगना रनौतनं बीएमसीविरूद्ध दाखल केलेला खटला मागे घेतला आहे. (Kangana Ranaut has withdrawn the case filed against BMC)
मुंबई : कंगना रनौतनं बीएमसीविरूद्ध दाखल केलेला खटला मागे घेतला आहे. बेकायदेशीररित्या तीन फ्लॅट्स एकत्र केल्याप्रकरणी मुंबई महापालिकेनं आक्षेप घेतला होता. त्यानंतर कंगनानं उच्च न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणात बीएमसीविरुद्ध कोर्टात विजय मिळणार नाही, हे कंगनालाही कुठेतरी कळलं असावं, म्हणूनच आता तिनं तिचा खटला मागे घेतला आहे. आपण बीएमसीविरोधातील खटला मागे घेत असून, नागरी संस्थेशी बोलून हे बेकायदा बांधकाम प्रकरण सोडवले जाईल, असं आज कंगनानं स्पष्ट केलं आहे.
हायकोर्टानं विचारला जाब
मुंबई उच्च न्यायालयानं 3 फेब्रुवारी रोजी खार येथील फ्लॅटचं बेकायदा बांधकाम केल्याप्रकरणी कंगनाला दिलासा दिला. कंगना रनौतच्या फ्लॅटवर कारवाई करण्याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेनं (बीएमसी) दिलेल्या लोअर कोर्टाचा निकाल मुंबई उच्च न्यायालयानं कायम ठेवला होता. तिच्या फ्लॅटमधील कथित बदल नियमित करण्यासाठी अर्ज दाखल करणार की नाही, याबाबत कोर्टानं कंगनाला 5 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयाला कळवण्याचे आदेश दिले होते.
काय आहे प्रकरण
मार्च 2018 मध्ये बीएमसीनं कंगना रनौतला खारमधील तीन फ्लॅट एकत्र विलीन केल्याबद्दल नोटीस बजावली होती. डिसेंबर 2020 मध्ये बीएमसीच्या नोटीसविरोधात कंगनाची याचिका दिवाणी कोर्टानं फेटाळली आणि त्यानंतर कंगनानं उच्च न्यायालयात धाव घेतली. कंगनाची याचिका नाकारताना दिवाणी कोर्टानं म्हटलं की, परवानगीशिवाय तीन फ्लॅट विलीन करणं बेकायदेशीर आहे.
कंगना रनौतवर आहेत हे आरोप
कंगनाच्या वकिलांनी मुंबई हायकोर्टाला सांगितलं होतं की, हा खटला अभिनेत्रीविरूद्ध सूडाचा भाग आहे. हे फ्लॅट्स तयार करणाऱ्या कंपनीकडून विलीन केले गेले आहेत, कंगना रनौत यांनी केलेले नाहीत. त्याचवेळी वरिष्ठ सल्लागार चिनॉय आणि वकील जोएल कार्लोस यांनी न्यायालयात झालेल्या तपासणीदरम्यान सांगितलं की, फ्लॅटमध्ये बेकायदेशीरपणे 8 बदल करण्यात आले आहेत. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर कोर्टानं आपल्या आदेशानुसार अभिनेत्रीला 5 फेब्रुवारीपर्यंत दिलासा दिला आणि तिचा जबाब दाखल करण्यास सांगितलं.
संबंधित बातम्या
Ira Khan Video | मी ठीक आहे, पण मला रडू कोसळतंय, आमीरची मुलगी इरा खानचं डिप्रेशनशी द्वंद्व