अरे देवा! कंगना वडिलांबाबत हे काय बोलली?; चाहते म्हणाले, थू तुझ्यावर!
कंगना रनौत (Kangana Ranaut) सध्या सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह आहे. कंगना तिच्या वादग्रस्त ट्विटमुळे नेहमीच टार्गेट होते आहे.
मुंबई : कंगना रनौत (Kangana Ranaut) सध्या सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह आहे. कंगना तिच्या वादग्रस्त ट्विटमुळे नेहमीच टार्गेट असते. आता कंगनाने अशाच प्रकारचे एक वादग्रस्त ट्विट केलं आहे. त्यामध्ये कंगनाने तिचे आणि वडिलांचे नाते कसे होते याबद्दल सांगितले आहे हे सांगताना कंगनाने एक वादग्रस्त विधान केले आहे आणि त्यानंतरच तिला आता ट्रोल केलं जात आहे. (Kangana Ranaut is being trolled on social media)
My father has licensed rifle and guns, growing up he didn’t scold he roared, even my ribs trembled, in his youth he was famous for gang wars in his college which gave him a reputation of a gunda, I fought with him at 15 and left home, became first Baaghi Rajput woman at 15.
— Kangana Ranaut (@KanganaTeam) February 20, 2021
पहिल्या ट्विटमध्ये कंगनाने लिहिले आहे की, माझ्या वडिलांकडे रायफल आणि बंदूक होती, मी लहान असताना त्यांनी मला रागावले की, माझे पाय थरथर कापायचे माझ्या वडिलांची ओळख गुंड म्हणून होती. मी वयाच्या 15 व्या वर्षी त्यांच्यासोबत भांडणे केली होती आणि मी 15 व्या वर्षी माझे घर सोडले होते. दुसर्या ट्विटमध्ये कंगना लिहिली आहे की, या चिल्लर इंडस्ट्रीचा लोकांना असे वाटते की, मला मिळालेले यश माझ्या डोक्यात गेले आहे. पण मी नेहमीच वाघ होते, फक्त माझ्या यशामुळे माझा आवाज बुलंद झाला आहे.
My papa he wanted to make me the best doctor in the world, he thought he was being a revolutionary papa by giving me education in best institutions, when I refused to go to school he tried to slap me I held his hand and famously told him “ if you slap me I will slap you back” pic.twitter.com/5nU6x6iQtL
— Kangana Ranaut (@KanganaTeam) February 20, 2021
आज मी देशाचा सर्वात मोठा महत्वाचा आवाज आहे. इतिहास हा साक्षीदार आहे ज्याने मला सुधारण्याचा प्रयत्न केला. अशा लोकांना मीच सुधारले आहे. दुसर्या ट्विटमध्ये कंगनाने वडिलांच्या फोटो शेअर करत लिहिले आहे की, माझ्या वडिलांना मला सर्वोत्कृष्ट डॉक्टर बनवायचे होते. जेव्हा मी शाळेत जाण्यास नकार दिला, तेव्हा त्यांनी मला चापट मारण्याचा प्रयत्न केला,
That was it end of our relationship something changed in his eyes, he looked at me then my mother and left the room, I knew I had crossed the line and never found him back again but one can only imagine the extend i can go to break free, nothing can keep me caged.
— Kangana Ranaut (@KanganaTeam) February 20, 2021
मी त्यांचा हात धरला आणि म्हणाले की, जर तुम्ही मला मारहाण केली तर मीसुद्धा तुम्हाला मारेल…त्यावेळी माझ्या वडिलांनी फक्त मला पाहिले आणि माझ्या आईला पाहिले आणि निघून रूममध्ये गेले. त्यानंतर मी कधीच त्यांच्याजवळ जाऊ शकले नाही. मी कायमची त्यांच्यापासून दूर गेले. यातून मला फक्त एवढेच सांगायचे आहे की, बेडिया तोडण्यासाठी मी कोणत्याही हद्दीपर्यंत जाऊ शकते. मला कोणीही बांधून ठेऊ शकत नाही.
संबंधित बातम्या :
Video : अंकिता लोखंडेचा आणखी एक डान्स व्हिडीओ व्हायरल; सुशांतच्या चाहत्यांनी केलं ट्रोल
रणवीर सिंहच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी; ’83’ चित्रपट या तारखेला रिलीज होणार!
श्वेता तिवारीविरोधात पती अभिनवची कोर्टात धाव, मुलाला भेटू न देण्याचा आरोप!
(Kangana Ranaut is being trolled on social media)