घटस्फोटाची चर्चा असतानाच ऐश्वर्या रायबद्दल थेट कंगना राणावत हिने केले ‘हे’ मोठे विधान, ऐश ही..
कंगना राणावत ही कायमच चर्चेत असते. कंगना राणावत हिने चित्रपट सतत फ्लाॅप जाताना दिसत आहेत. दुसरीकडे ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे त्यांच्या रिलेशनमुळे जोरदार चर्चेत आहेत. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचे अनेक व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

मुंबई : कंगना राणावत हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. नेहमीच कंगना राणावत ही बाॅलिवूड कलाकारांवर मोठ्या प्रमाणात टीका करताना दिसते. कंगना राणावत आणि वाद हे समीकरण गेल्या काही दिवसांपासून सतत बघायला मिळतंय. कंगना राणावत हिच्या निशाण्यावर कायमच बाॅलिवूड कलाकार असतात. कंगना राणावत ही सोशल मीडियावर कायमच सक्रिय दिसते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना कंगना राणावत दिसते. कंगना राणावत हिचे एका मागून एक चित्रपट फ्लाॅप जाताना देखील दिसत आहेत. मध्यंतरी चर्चा होती की, कंगना राणावत ही राजकारण प्रवेश करणार आहे.
असे पहिल्यांदाच झाले असेल की, कंगना राणावत हिने चक्क एखाद्या बाॅलिवूड अभिनेत्रीचे काैतुक केले असेल. नुकताच कंगना राणावत हिने इंस्टा स्टोरीवर एक पोस्ट शेअर केलीये. या पोस्टमध्ये कंगना राणावत ही चक्क ऐश्वर्या राय हिचे काैतुक करताना दिसतंय. सोबतच कंगना राणावत हिने ऐश्वर्या राय हिचा एक फोटो देखील शेअर केलाय.
कंगना राणावतने ‘हम दिल दे चुके सनम’ ची क्लिप शेअर केल्या. कंगनाने म्हटले की, ऐशची डिवाइन खूप जास्त सुंदर आणि एप्रिसिएशन स्टोरी आहे. आता कंगना राणावत हिची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे. चाहचे हे या पोस्टवर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. कंगना राणावत आणि ऐश्वर्या राय यांच्यामध्ये चांगले रिलेशन असल्याचे देखील सांगितले जाते.
गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या राय ही तिच्या पर्सनल लाईफमुळे जोरदार चर्चेत आहे. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यामध्ये सर्वकाही व्यवस्थित सुरू नसल्याचे सांगितले जातंय. हेच नाही तर ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे लवकरच घटस्फोट घेणार असल्याचे देखील सातत्याने सांगितले जातंय. मात्र, यावर अजूनही काही खुलासा होऊ शकला नाही.
मध्यंतरी सांगण्यात आले की, ऐश्वर्या राय हिने अभिषेक बच्चन याचे घर देखील सोडले आहे. ऐश्वर्या राय ही तिच्या आईच्या घरी शिफ्ट झालीये. अभिषेक बच्चन याच्या वाढदिवसाच्या दिवशी खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत ऐश्वर्या रायने त्याला शुभेच्छा दिल्या होत्या. ऐश्वर्या राय हिची ही पोस्ट पाहून चाहत्यांमध्ये मोठा आनंद हा बघायला मिळाला. ऐश्वर्या रायची पोस्ट तूफान व्हायरल होताना दिसली.