अक्षय कुमार स्टारर ‘सेल्फी’ सिनेमाला कंगना रनौत हिने ठरवलं ‘फ्लॉप’, पोस्ट करत म्हणाली…

'ज्या प्रकारे मला त्रास देतात...', अक्षय कुमार स्टारर 'सेल्फी' सिनेमाला अपयश मिळाल्यानंतर असं का म्हणाली कंगना रनौत ? सोशल मीडियाच्या माध्यमातून पुन्हा संतापली अभिनेत्री

अक्षय कुमार स्टारर 'सेल्फी' सिनेमाला कंगना रनौत हिने ठरवलं 'फ्लॉप', पोस्ट करत म्हणाली...
Follow us
| Updated on: Feb 25, 2023 | 11:17 AM

Kangana Ranaut On Selfiee : अभिनेता अक्षय कुमार (akshay kumar) स्टारर ‘सेल्फी’ सिनेमाला बॉक्स ऑफिसवर अपयश मिळालं आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी सिनेमाला प्रेक्षकांकडून हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमार याचा सेल्फी हा चित्रपट 2023 मधील पहिला रिलीज झालेला चित्रपट (Movie) आहे. अक्षय कुमार याच्यासाठी 2022 हे वर्ष काही खास गेले नाही. पण नव्या वर्षातील पहिला सिनेमा देखील अपयशी ठरल्यानंतर सर्वत्र चर्चा रंगल्या आहेत. सिनेमा अपयशी ठरल्यानंरत अभिनेत्री कंगना रनौत हिने दिग्दर्शक करण जोहर याच्यावर निशाणा साधला आहे.

कंगना हिने इन्स्टाग्रामवर दिग्दर्शक करण जोहर निर्मित ‘सेल्फी’ सिनेमाला फ्लॉप ठरवलं आहे. अक्षय कुमार आणि इमरान हाशमी मुख्य भूमिकेत असलेल्या ‘सेल्फी’ सिनेमाचं दिग्दर्शन राज मेहता यांनी केलं आहे. तर दुसरीकडे बॉक्स ऑफिसच्या एका रिपोर्टमध्ये कंगनाची अक्षय कुमारसोबत तुलना करण्यात आला. यावर प्रतिक्रिया देत कंगनाने करण जोहरची खिल्ली उडवली आहे.

हे सुद्धा वाचा

इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत कंगना म्हणाली, ‘करण जोहरच्या सेल्फी सिनेमाने पहिल्या दिवशी फक्त १० लाख रुपयांचा गल्ला जमा केला आहे. यावर एकाही ट्रेड विश्लेषक आणि मीडियाने खुलासा केलेला नाही. ज्याप्रमाणे मला त्रास देतात, त्यांची खिल्ली उडवण्यास किंवा धमकावण्यास विसरले असतील…’

पुढच्या पोस्टमध्ये कंगना एक आर्टिकल शेअर केला आहे. अभिनेत्रीने शेअर केलेल्या आर्टिकलचं टायटल “कंगना रनौत का मेल वर्जन!’ असं आहे. यावर कंगना म्हणाली, ‘मी सेल्फी फ्लॉप झाला अशी बातमी शोधत होती. पण पाहिलं तर प्रत्येक बातमी माझ्यावर आहे… आता ही देखील माझी चूक आहे का…’ पुढे कंगना म्हणाली, ‘वाह भाई करण जोहर’ सध्या कंगनाची पोस्ट सर्वत्र व्हायरल होत आहे.

‘सेल्फी सिनेमाला अपयश मिळाल्यामुळे सर्वत्र अक्षय सर आणि मला दोषी ठरवत आहेत. सर्वत्र आमच्यावर आर्टिकल आहेत. कोणत्याही आर्टिकलमध्ये करण जोहरचं नाव नाही…’ असं म्हणत कंगनाने पुन्हा करण जोहर याच्यावर निशाना साधला आहे.

सांगायचं झालं तर, ‘सेल्फी’ सिनेमा मल्याळम सिनेमा ‘ड्रायव्हिंग लायसन्स’चा हिंदी रिमेक आहे. पृथ्वीराज आणि सूरज वेंजारामूडू यांनी ‘ड्रायव्हिंग लायसन्स’ सिनेमात मुख्य भूमिका साकारली होती. तर सिनेमाचा रिमेक ‘सेल्फी’ मध्ये अक्षय कुमार आणि इमरान हाश्मी मुख्य भूमिकेत चाहत्यांच्या भेटीस आले. आता येणाऱ्या दिवसांत सिनेमा किती रुपयांचा गल्ला जमा करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.