Kangana Ranaut च्या आयुष्यात खऱ्या प्रेमाची एन्ट्री? अभिनेत्रीच्या पोस्टमुळे सर्वत्र खळबळ

'क्वीन'ला भेटला तिच्या स्वप्नातील 'किंग'? कंगनाच्या 'त्या' पोस्टमुळे सर्वत्र चर्चांना उधाण, चाहत्यांनी अभिनेत्रीला विचारलं, 'कोण आहे तो?'

Kangana Ranaut च्या आयुष्यात खऱ्या प्रेमाची एन्ट्री? अभिनेत्रीच्या पोस्टमुळे सर्वत्र खळबळ
Follow us
| Updated on: Apr 11, 2023 | 12:29 PM

मुंबई : अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) कायम तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. कायम स्वतःच्या डोक्यावर वादाचा मुकूट घेवून मिरवणारी कंगना आज तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. कंगना कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. आजपर्यंत कंगनाचं अनेक अभिनेत्यांसोबत नाव जोडण्यात आलं. पण अभिनेत्रीचं कोणत्याही अभिनेत्यासोबत नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. पण गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्रीचं कोणत्याही सेलिब्रिटीसोबत नाव जोडण्यात आलेलं नाही. कंगनाला कायम विचारलं जातं तुझ्या आयुष्यातील खास व्यक्ती कोण आहे? तू लग्न कधी करणार? पण आजपर्यंत अभिनेत्रीने कधीही यावर स्पष्टीकरण दिलं नाही. पण आता एका पोस्टमुळे कंगनाचं खासगी आयुष्य पुन्हा चर्चेत आलं आहे.

कंगनाने ट्विटरवर स्वतःचे काही फोटो शेअर केले आहेत. कंगनाचे फोटो पाहून अभिनेत्रीच्या आयुष्यात खऱ्या प्रेमाची एन्ट्री झाली का? अशी चर्चा रंगत आहे. फोटो पोस्ट करत कंगनाने खास कॅप्शन देखील लिहिलं आहे. ज्यामुळे अभिनेत्री प्रेमात असल्याचा अंदाज चाहते व्यक्त करत आहेत. सध्या सर्वत्र कंगनाच्या पोस्टची चर्चा आहे.

हे सुद्धा वाचा

kangna ranavat

स्वतःचे काही फोटो पोस्ट करत कंगनाने कॅप्शनमध्ये, ‘इश्क वो आतिश है गालिब जो लगाने से लगती नही और बुझाने से बुझती नही.’असं लिहिलं आहे. शिवाय बदामाच्या आकाराचा इमोजी देखील पोस्ट केला आहे. कंगनाची पोस्ट पाहून चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

एका चाहत्याने अभिनेत्रीच्या अंदाजात खास कमेंट केली आहे. ‘कोण आहे तो, जो तुझ्या स्वप्नात आला, मनात भरला… आज गुपित सांग…’, अन्य एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘क्विन प्रेमात पडली आहे…’ सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या पोस्टची चर्चा रंगत आहे.

सांगायचं झालं तर, २०१७ मध्ये कंगना रनौत हिने तिच्या आवडीबद्दल सांगितलं होतं. अभिनेत्री म्हणाली होती की, ती वर्दीमध्ये असलेल्या मुलांकडे आकर्षित होते. तिला वर्दीमधील मुलं प्रामाणिक वाटतात.

kangna ranavat

२०२१ मध्ये झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली होती की, ‘मला लग्न आणि मुलं नक्कीच हवी आहेत. मला वाटतं की मी पुढील पाच वर्षांत स्वत:ला पत्नी आणि आई बनताना पाहते.’ त्यामुळे कंगना कधी लग्नबंधनात अडकणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे…

कंगना कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. कंगना कायम बॉलिवूडबद्दल अनेक धक्कादायक गोष्टी चाहत्यांना सांगत असते.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.