पीएम मोदी – मेलोनी यांच्या ‘मलोडी’ व्हिडीओवर कंगना रनौतची पहिली प्रतिक्रिया
Kangana Ranaut : पीएम मोदी - मेलोनी यांच्या 'मलोडी' व्हिडीओवर कंगना रनौत आनंद व्यक्त करत म्हणते..., सध्या सर्वत्र कंगना हिने शेअर केलेल्या पोस्टची चर्चा... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त कंगना रनौत यांची चर्चा... अभिनेत्री कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे असते चर्चेत...
इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात चांगले मैत्रीपूर्ण संबंध आहेत. दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. दरम्यान, मेलोनी यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओ पोस्ट करत मेलोनी यांनी ‘हाय मित्रांनो, #Melody कडून.’ असं म्हणताना दिसत आहे. व्हिडीओ नेटकरी लाईक्स आणि कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत.
Hi friends, from #Melodi pic.twitter.com/OslCnWlB86
— Giorgia Meloni (@GiorgiaMeloni) June 15, 2024
इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओवर खासदार कंगना रनौत यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. कंगना व्हिडीओवर पोस्ट करत म्हणाल्या, ‘मोदीजींचा सर्वात उत्तम गुण म्हणजे ते महिलांना जाणवतात की ते त्यांच्या पाठीशी ते कायम आहेत आणि महिलांची उन्नती व्हावी अशी त्यांची इच्छा आहे. पंतप्रधान मोदी हे मेलोनी यांच्या टीममधील आहे… याचं त्यांना आश्चर्य वाटत नाही…’ असं कंगना म्हणाल्या.
सांगायचं झालं तर, इटलीच्या अपुलियामध्ये G7 देशांची बैठक सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खास या बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आलं आहे. पंतप्रधान मोदी सध्या इटलीमध्ये आहेत. तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर पीएम मोदी यांचा हा पहिलाच परदेश दौरा आहे. सध्या मोदी आणि मेलोनी यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
पहिल्यांदा निवडूण आल्या आहेत कंगना रनौत…
कंगना यांनी भाजपच्या वतीने अभिनेत्री हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवत विजय मिळवला आहे. बॉलिवूडमध्ये स्वतःची भक्कम ओळख निर्माण केल्यानंतर कंगना यांनी आता स्वतःचा मोर्चा राजकारणाकडे वळवला आहे. त्यामुळे येत्या काळात कंगना यांच्या कामांकडे संर्वांचं लक्ष असणार आहे.
कंगना यांच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, कंगना ‘इमरजेन्सी’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. दरम्यान, खासदार झाल्यानंतर कंगना रनौत बॉलिवूडमध्ये सक्रिय राहाणार का? असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे.
कंगना यांचा बहुप्रतीक्षीत ‘इमरजेन्सी’ सिनेमाची सर्वत्र चर्चा रंगली आहे. सिनेमात कधी प्रदर्शित होणार असा प्रश्न देखील आता उपस्थित होत आहे. सिनेमा कंगना रनौत तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारताना दिसणार आहे.