Kangana Ranaut : 36 वर्षांची कंगना रनौत अडकणार विवाहबंधनात, कोण असेल अभिनेत्रीचा पती?

Kangana Ranaut : येत्या 5 वर्षात कंगना रनौत देखील थाटणार संसार? खुद्द अभिनेत्रीने केलं मोठं वक्तव्य... पण कोण असेल अभिनेत्रीचा पती? सध्या सर्वत्र कंगना रनौत हिच्या खासगी आयुष्याची चर्चा.. कधी आणि कोणासोबत अभिनेत्री अडकणार विवाहबंधनात

Kangana Ranaut : 36 वर्षांची कंगना रनौत अडकणार विवाहबंधनात, कोण असेल अभिनेत्रीचा पती?
Follow us
| Updated on: Oct 26, 2023 | 10:04 AM

मुंबई : 26 ऑक्टोबर 2023 | बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाचे वारे वाहत आहेत. अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या जोडीदारासोबत लग्न करत संसार थाटला. त्यामुळे अभिनेत्री कंगना रनौत कधी लग्न करणार अशी चर्चा रंगत आहे. यावर खुद्द कंगना हिने मोठं वक्तव्य केलं आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री लग्नाच्या योजनेबद्दल मोठा खुलासा केला आहे. अभिनेत्री म्हणाली, मी एक फॅमिली पर्सन आणि मी लवकरच लग्न करेल… स्वतःचं कुटुंब असावं अशी प्रत्येक मुलीची इच्छा असते. मला पण असंच वाटतं.. कुटुंब माझ्यासाठी फार महत्त्वाचं आहे. मला माझं स्वतःचं कुटुंब हवं आहे आणि पाच वर्षांमध्ये मी लग्न करेल…

कंगना हिला, ‘लव्ह मॅरिज करणार की, कुटुंबाच्या इच्छेने लग्न करणार?’ असा देखील प्रश्न विचारण्यात आला. यावर कंगना म्हणाली, ‘दोन्ही प्रकारे असायला हवं…’ एवढंच नाही तर, यावेळी कंगनाने हिने तिच्या भूतकाळातील रिलेशनशिपबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं.. सध्या सर्वत्र कंगना रनौत हिची चर्चा रंगली आहे.

अपयशी रिलेशनशिपबद्दल अभिनेत्री म्हणाली, ‘प्रत्येक रिलेशनशिपमध्ये तुम्हाला यश मिळेल असं नाही… पण मी माझ्या प्रत्येक रिलेशनशिपमध्ये माझं बेस्ट दिलं आहे…’ कंगना हिचं नाव आदित्य पंचोली, अध्ययन सुमन आणि हृतिक रोशन याच्यासोबत देखील जोडण्यात आलं.

हे सुद्धा वाचा

हृतिक याच्यासोबत असलेल्या नात्यामुळे अभिनेत्री अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. अनेक सेलिब्रिटींसोबत रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर अभिनेत्री कधी आणि कोणासोबत लग्न करणार याबद्दल चर्चा रंगली आहे. दरम्यान, अभिनेत्री एका श्रीमंत उद्योजकासोबत लग्न करणार असल्याचा दावा एका प्रसिद्ध अभिनेत्याने केला होता.

कंगना एप्रिल २०२४ मध्ये लग्न बंधनात अडकणार असल्याचा दावा अभिनेत्याने ट्विटरच्या माध्यमातून केला होता. केआरके ट्विट करत म्हणाला, ‘अभिनेत्री कंगना रनौत हिचा साखरपुडा डिसेंबर २०२३ मध्ये उद्योजकासोबत होणार आहे. एप्रिल २०२४ मध्ये कंगना विवाहबंधनात अडकणार आहे…! तिला खूप शुभेच्छा…!’ यावर अद्याप कंगना हिने स्पष्टीकरण दिलेलं नाही.

कंगना रनौत हिचे आगामी सिनेमे

कंगना रनौत हिच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री लवकरच ‘तेजस’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. २७ ऑक्टोबर रोजी ‘तेजस’ सिनेमा प्रदर्शित होणार आहे. सिनेमात कंगना फायटर पायलट तेजस गिल यांच्या भूमिकेत दिसणार आहे.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.