Kangana Ranaut | ‘तो कधीच महिलांचा वापर…’, प्रसिद्ध अभिनेत्याबद्दल कंगना रनौत हिचं मोठं वक्तव्य

Kangana Ranaut | बॉलिवूडमधील घराणेशाही आणि गटबाजी विरोधात बोलणाऱ्या कंगना रनौत हिचं मोठं वक्तव्य... सोशल मीडियावर 'त्या' अभिनेत्याचा फोटो पोस्ट करत अभिनेत्रीकडून मोठा खुलासा...

Kangana Ranaut | 'तो कधीच महिलांचा वापर...', प्रसिद्ध अभिनेत्याबद्दल कंगना रनौत हिचं मोठं वक्तव्य
Follow us
| Updated on: Aug 15, 2023 | 10:29 AM

मुंबई | 15 ऑगस्ट 2023 : अभिनेत्री कंगना रनौत कायम कोणत्या न कोणत्या करणामुळे चर्चेत असते. कंगना ही चालू किंवा तिला खटकणाऱ्या मुद्द्यांवर स्पष्ट मत मांडत असते. अभिनेत्रीने दिग्दर्शक करण जोहर, बॉलिवूडमधील घराणेशाही आणि गटबाजी विरोधात अनेकदा आवाज उठवला आहे. अभिनेत्रीने अनेकांवर टीका देखील केली आहे. पण आता अभिनेत्रीने कोणत्या सेलिब्रिटींवर निशाणा साधला नाही तर, प्रसिद्ध अभिनेत्याचं कौतुक केलं आहे. कंगनाने अभिनेता सनी देओल, सलमान खान यांचं कौतुक केलं नाही तर, चक्क जॉन अब्राहम याचं कौतुक केलं आहे..

कंगना हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने जॉन अब्राहम याचं कौतुक केलं आहे. ‘मी आतापर्यंत फिल्म इंडस्ट्रीमधील अनेक लोकांबद्दल नकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. पण जे प्रेरणादायी आणि सज्जन आहे, त्यांना विसरून चालणार नाही.’

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘मी जॉन अब्राहम याच्यासोबत काम केलं आहे. तो किती उत्तम कलाकार आहे हे मी शब्दात सांगू शकत नाही. जॉन याच्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहेत. कारण जॉन स्वतःचं कौतुक करण्यासाठी माध्यमांना पैसे देत नाही. तो अत्यंत दयाळू व्यक्ती आहे…’

‘जॉन पैसे देत दुसऱ्यांबद्दल नकारात्मक वातावरण तयार करत नाही. तो कोणाला त्रास देत नाही. तो महिलांचा फायदा उचलत नाही. तो एक माणूस म्हणून खूप चांगला आहे… लव्ह यू जॉन…’ असं देखील कंगना रनौत म्हणाला आहे….

कंगना हिच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री ‘इमर्जन्सी’ या सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणारआहे, ज्यामध्ये अभिनेत्री माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. या सिनेमात कंगना हिच्यसोबत अनुपम खेर, महिमा चौधरी, श्रेयस तळपदे यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

‘इमर्जन्सी’ कंगना ‘तेजस’ आणि ‘चंद्रमुखी 2’ सिनेमात देखील दिसणार आहे. ‘चंद्रमुखी 2’ हा तमिळ सिनेमातील हिट हॉरर सिनेमा ‘चंद्रमुखी’ चा सिक्वेल आहे, ज्यामध्ये रजनीकांत आणि ज्योतिका मुख्य भूमिकेत आहेत. ‘चंद्रमुखी 2’ मधील कंगनाचा फर्स्ट लूक समोर आला आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीची चर्चा रंगत आहे.

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.