‘जर मी पुन्हा हा शब्द ऐकला तर…’, कंगना रनौत कोणाला देतेय इशारा
अनेक मुद्द्यांवर परखड भूमिका मांडणाऱ्या कंगनाने आता कोणावर निशाणा साधला आहे. आसा कोणता शब्द आहे, ज्याचा तिव्र निषेध करतेय कंगना. अभिनेत्री ट्विट करत म्हणाली..
मुंबई : कायम वादाच्या भोवऱ्यात अडकणारी आणि वादाचा मुकूट डोक्यावर घेवून फिरणारी अभिनेत्री कंगना रनौत पुन्हा ट्विटरवर सक्रिय झाली आहे. अनेक मुद्द्यांवर परखड भूमिका मांडणाऱ्या कंगनाने आता अभिनेता शाहरुख खान याच्या पाठण सिनेमावर निशाणा साधला आहे. एकीकडे अनेक जण पठाण सिनेमाचं कौतुक करत आहेत, तर दुसरीकडे कंगना मात्र पठाण सिनेमावर निशाणा साधण्याची एक संधी देखील सोडत नाही. आता तर अभिनेत्रीने ‘द्वेषावर विजय’ म्हणणाऱ्या लोकांना इशारा दिला आहे. कंगनाने एक ट्विट केलं आहे. सध्या कंगनाचं ट्विट सर्वत्र व्हायरल होत आहे.
पठाण सिनेमाला यश मिळाल्यानंतर चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींनी देखील शाहरुख खानला शुभेच्छा दिल्या. अभिनेत्री आलिया भट्ट हिने, ‘प्रेम कायम जिंकतं…’ असं म्हणत अभिनेत्याला शुभेच्छा दिल्या, तर दिग्दर्शक करण जोहर याने ‘द्वेषावर विजय’ असं म्हणाला होता. यावर कंगना असं कायम म्हणाली, ज्यामुळे अभिनेत्री चर्चेत आली आहे.
ट्विट करत कंगना म्हणाली, ‘बॉलिवूडकरांनी नॅरेटिव्ह बणण्याचा प्रयत्न करु नका की तुम्ही या देशात तुम्ही हिंदू द्वेषामुळे पीडित आहात. जर मी पुन्हा ‘द्वेषावर विजय’ हा शब्द ऐकला तर पुन्हा तुमचा क्लास घेईल. यशाचा आनंद घ्या. चांगलं काम करा राजकारणापासून दूर राहा…’ असं कंगनाने ट्विटमध्ये म्हटलं आहे.
Bollywood walon yeh narrative banane ki koshish mat karna ki iss desh mein tum Hindu hate se suffer kar rahe ho, agar maine phir se yeh word suna ‘triumph over hate’ toh tum logon ki wahi class lagegi jo kal lagi thi, enjoy your success and do good work, stay away from politics.
— Kangana Ranaut (@KanganaTeam) January 28, 2023
गेल्या काही दिवसांपासून बॉलिवू़डचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास धमाका करू शकत नसतानाच पठाण चित्रपटाने चांगली कामगिरी करण्यास सुरूवात केलीये. करण जोहर याने देखील पठाण चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे कौतुक करत एक पोस्ट शेअर केली होती.
शाहरुख खान याने तब्बल चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुन्हा पदार्पण केल्यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सध्या सर्वत्र पठाण सिनेमाची जादू पाहायला मिळत आहे. सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या दिवशी देखील अनेक संघटनांनी सिनेमाचा विरोध केला. पण त्याचा परिणाम बॉक्स ऑफिसवर झालेला नाही.