‘आमिर खान माझा चांगला मित्र होता, पण हृतिकने माझ्यावर केस केल्यानंतर..’; कंगना रनौतचा मोठा आरोप

हृतिक आणि कंगनाने क्रिश 3 या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्यानंतर आशिकी 3 मध्ये या दोघांना कास्ट केल्याची माहिती समोर आली.

'आमिर खान माझा चांगला मित्र होता, पण हृतिकने माझ्यावर केस केल्यानंतर..'; कंगना रनौतचा मोठा आरोप
Aamir Khan, Kangana Ranaut and Hrithik RoshanImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 18, 2023 | 2:43 PM

मुंबई : अभिनेत्री कंगना रनौत आणि हृतिक रोशन यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. हृतिक रोशनने केलेल्या केसमुळे आमिरनेही आपला मार्ग वेगळा केला, असं आता कंगना म्हणाली. नुकताच तिने इन्स्टा स्टोरीमध्ये आमिरचा एक जुना व्हिडीओ शेअर काल. ‘सत्यमेव जयते’ या त्याच्या टीव्ही शोमधील हा व्हिडीओ आहे. एका फॅन पेजने हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला. कंगनाने तोच शेअर करत आमिरसोबतच्या मैत्रीविषयी खुलासा केला. कंगनाने ‘सत्यमेव जयते’ या शोमध्ये दीपिका पदुकोण आणि परिणीती चोप्रा यांच्यासोबत हजेरी लावली होती.

हा व्हिडीओ शेअर करत कंगनाने लिहिलं, ‘खरंतर मलासुद्धा कधी कधी ते दिवस आठवतात जेव्हा आमिर सर माझे चांगले मित्र होते. ते दिवस कुठे गेले काय माहीत?’ याच पोस्टमध्ये तिने हृतिकसोबतच्या कायदेशीर बाबींचाही उल्लेख केला. ‘एक गोष्ट नक्की आहे की त्याने मला मार्गदर्शन केलं, माझं कौतुक केलं आणि मला एक दिशा दाखवली. पण हृतिकने माझ्याविरोधात खटला दाखल केल्यानंतर त्याने त्याचा वेगळा मार्ग निवडला. त्यानंतर संपूर्ण इंडस्ट्रीविरोधात एक महिला असा लढा सुरू झाला’, असं तिने पुढे म्हटलंय.

कंगना आणि हृतिक यांनी एकमेकांना कायदेशीर नोटीस बजावल्या होत्या. 2020 मध्ये जेव्हा हृतिकने तिच्याविरोधात दाखल केलेला एफआयआर हा सायबर सेलकडून क्राइम इंटेलिजन्स युनिटकडे हलविण्यात आला, तेव्हा कंगनाने ट्विट केलं होतं की, ‘आता हृतिकने त्याच्या आयुष्यात पुढे जावं’. हृतिक आणि कंगनाने क्रिश 3 या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्यानंतर आशिकी 3 मध्ये या दोघांना कास्ट केल्याची माहिती समोर आली. मात्र हृतिकने कंगनाला चित्रपट स्वीकारण्यास नकार दिला होता. तेव्हापासून दोघांमध्ये वादाला सुरुवात झाली.

हे सुद्धा वाचा

कंगनाची पोस्ट

कंगनाने हृतिकसोबतच्या नात्याबद्दल एका मुलाखतीत वक्तव्य केलं होतं. मात्र त्यास हृतिकने नकार दिला. त्यानंतर कंगनाने काही मेल्स शेअर केले होते. एका मुलाखतीत हृतिकला ‘एक्स’ (बॉयफ्रेंड) म्हणत कंगनाने बऱ्याच गोष्टी सांगितल्या होत्या. त्यानंतर हृतिकने कंगनाला कायदेशीर नोटीस पाठवली होती. कंगनाने त्यावर उत्तर दिलं नाही म्हणून हृतिकने तिच्यावर केस दाखल केली. कंगनानेही हृतिकविरोधात गुन्हा दाखल केला. हे प्रकरण आजपर्यंत सुरू आहे.

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...