‘जय सियाराम, जय सियाराम…’ आमिर खान याच्या लेकीच्या लग्नात कंगनाची जोरदार घोषणाबाजी; कारण काय?

| Updated on: Jan 14, 2024 | 12:16 PM

Ira Khan and Nupur Shikhare Wedding Reception : आमिर खान याची लेक आयरा खान हिच्या रिसेप्शनमध्ये कंगना रनौत हिचा खास अंदाज, सर्वांसमोर लावले 'जय सियाराम, जय सियाराम...' चे नारे, व्हिडीओ व्हायरल

‘जय सियाराम, जय सियाराम…’ आमिर खान याच्या लेकीच्या लग्नात कंगनाची जोरदार घोषणाबाजी; कारण काय?
Follow us on

मुंबई | 14 जानेवारी 2024 : अयोध्येतील राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेसाठी अनेक बॉलिवूड स्टार्सनाही आमंत्रित करण्यात आले आहे. संपूर्ण भारतात आणि सोशल मीडियावर अयोध्येतील राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेची चर्चा सुरु आहे. अभिनेत्री कंगना रनौत हिला देखील आमंत्रित करण्यात आलं आहे. 22 जानेवारी रोजी कंगना अयोध्येला जाणार आहे. दरम्यान अभिनेत्रीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये अभिनेत्री ‘जय सियाराम, ‘जय सियाराम…’ असे नारे देताना दिसत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त कंगना रनौत हिची चर्चा रंगली आहे.

नुकतात कंगना रनौत, अभिनेता आमिर खान याची लेक आयरा खान आणि नुपूर शिखरे यांच्या रिसेप्शन पार्टीसाठी आली होती. कंगना हिला पाहिल्यानंतर पापाराझींनी ‘जय सियाराम, ‘जय सियाराम…’चे बोलायला सुरुवात केली. त्यानंतर कंगना देखील आनंदात ‘जय सियाराम, ‘जय सियाराम…’ बोलू लागली… सोशल मीडियावर कंगना हिचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

हे सुद्धा वाचा

 

 

अयोध्येतील राम मंदिराची प्राण प्रतिष्ठा

22 जानेवारी 2024 रोजी अभिषेक सोहळ्यानंतर भव्य अयोध्या मंदिरात प्रभू राम लल्ला यांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा केली जाणार आहे. सोहळ्यासाठी कंगना रनौत हिच्यासोबत अनेक सेलिब्रिटींनी उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त 22 जानेवारी 2024 या दिवसाची प्रतीक्षा आहे.

कंगना रनौत हिचे आगामी सिनेमे

अभिनेत्री कंगना रनौत ‘इमरजेन्सी’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात कंगना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमा सुरुवातील नोव्हेंबर 2023 मध्ये प्रदर्शित होणार होता. पण आता सिनेमा 2024 मध्ये प्रदर्शित होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

सिनेमात कंगना रनौत हिच्यासोबत, श्रेयस तळपदे, अनुपम खेर, दिवंगत अभिनेते सतीश कौशिक आणि अभिनेत्री महिमा चौधरी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त कंगना रनौत हिची चर्चा रंगली आहे.