मुंबई | 13 जानेवारी 2024 : अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. कायम वादाचा मुकूट आपल्या डोक्यावर मिरवणारी कंगना आता खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर कंगना हिचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये अभिनेत्री एका परदेशी व्यक्तीसोबत दिसत आहे. ज्यामुळे कंगना हिच्या डेटिंग लाईफची चर्चा रंगत आहे. कंगना हिच्यासोबत असलेला मिस्ट्री मॅन कोण आहे? असा प्रश्न सध्या चाहते विचारत आहेत.
शुक्रवारी संध्याकाळी कंगना हिला मुंबईतील एका सलॉनच्या बाहेर स्पॉट करण्यात आलं. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये अभिनेत्री एका माणसासोबत दिसत आहे. दोघांना एकमेंकाचा हात पकडला आहे. कंगना ब्लू कलरच्या ड्रेस आणि गॉगलमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. तर अभिनेत्रीसोबत असलेला मिस्ट्री मॅन ऑल-ब्लॅक लूकमध्ये दिसत आहे.
सोशल मीडियावर कंगना हिचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. चाहते देखील व्हिडीओवर कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत. एक नेटकरी म्हणाला, ‘हृतिक रोशन याच्या सारखाच दिसत आहे.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘हुबेहूब हृतिक साखऱ्या दिसणाऱ्या पुरुषाची निवड केली आहे…’ तर काही चाहत्यांनी अभिनेत्रीला शुभेच्छा दिल्या आहेत…
व्हिडीओमध्ये दिसणारा व्यक्ती कंगना हिचा बॉयफ्रेंड असल्याची चर्चा चाहत्यांमध्ये रंगत आहे. पण यावर अभिनेत्रीने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. कंगना आणि हृतिक यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, विवाहित असताना देखील हृतिक याचा जीव कंगना हिच्यावर जडला होता. अनेकदा दोघांमध्ये झालेले वाद देखील समोर आले. आता हृतिक, सबा आझाद हिला डेट करत आहे.
अभिनेत्री कंगना रनौत ‘इमरजेन्सी’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात कंगना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमा सुरुवातील नोव्हेंबर 2023 मध्ये प्रदर्शित होणार होता. पण आता सिनेमा 2024 मध्ये प्रदर्शित होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
सिनेमात कंगना रनौत हिच्यासोबत, श्रेयस तळपदे, अनुपम खेर, दिवंगत अभिनेते सतीश कौशिक आणि अभिनेत्री महिमा चौधरी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त कंगना रनौत हिची चर्चा रंगली आहे.