खासदार बनताच कंगना राणौतला लागले लग्नाचे वेध? या विधानानंतर चर्चा!

कंगना रणौतने बॉलिवूडमधील सर्वात चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे. तिने याआधी बॉलिवूडच्या अनेक कलाकारांसोबत पंगा घेतला आहे. इतकंच नाही तर अनेकांनी तिच्यावर बहिष्कार देखील टाकला आहे. असं असलं तरी तिने मात्र कधीही मागे वळून पाहिलेले नाही. अनेक हिट चित्रपट तिने दिले आहेत. आता ती आणीबाणी या चित्रपटासाठी चर्चेत आहे. या दरम्यान तिने लग्नाबाबत ही वक्तव्य केले आहे.

खासदार बनताच कंगना राणौतला लागले लग्नाचे वेध? या विधानानंतर चर्चा!
Follow us
| Updated on: Aug 19, 2024 | 6:27 PM

अभनेत्री कंगना रणौत आता खासदार झाली आहे. कंगना राणौत तिच्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असते. कधी ती सकारात्मक विधान करते तर कधी नकारात्मक. ज्यामुळे बऱ्याचदा तिला ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागला आहे. यावेळी कंगनाने लग्नाबाबत असे काही वक्तव्य केलंय ज्यामुळे ती चर्चेत आली आहे. अभिनेत्री लग्नाबाबत बोलत असताना कंगना राणौतच्या बोलण्यातून असे वाटत आहे की ती लवकरच लग्न करणार आहे. या वेळी तिने जीवनात जोडीदार असणे किती महत्त्वाचे आहे याबाबत वक्तव्य केलं आहे.

कंगना राणौतला लग्न करण्याबाबत राज शामानीच्या पॉडकास्टवर प्रश्न विचारण्यात आला होता. कंगनाला विचारण्यात आले की, तिला लग्न करून मुलांसह कुटुंब निर्माण करायचे आहे का? यावर अभिनेत्री म्हणाले की ‘हो, नक्कीच’

काय म्हणाली कंगना राणौत?

लग्नाबाबत कंगना रणौत म्हणाली की, “माझा विश्वास आहे की प्रत्येकाला जोडीदार असावा. जोडीदाराशिवाय जगणे अवघड आहे. प्रत्येकाला जोडीदार मिळायला हवा. त्यासाठी तुम्हाला योग्य व्यक्ती शोधावी लागेल.” जर तुम्हाला तुमचा स्वतःचा जोडीदार सापडला तर ती तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे. याशिवाय कंगना म्हणाली, “तुम्ही जितके मोठे व्हाल, तितके एकमेकांशी जुळवून घेणे अधिक कठीण होते. लहान वयात लग्न केले तर जुळवून घेणे खूप सोपे आहे.’

वर्क फ्रंटवरबद्दल बोलायचे झाले तर कंगना लवकरच आणीबाणीमध्ये दिसणार आहे, ज्यामध्ये ती भारताच्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट 2023 मध्ये रिलीज होणार होता, परंतु अनेक विलंब आणि अडथळ्यांनंतर, शेवटी 6 सप्टेंबर 2024 रोजी तो रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.

14 जूनला सिनेमा प्रदर्शित होणार होता. पण लोकसभा निवडणुकीत कंगना रणौत भाजपाकडून उमेदवार असल्याने ती निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त होती. हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघातून ती निवडून आली. त्यामुळे सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलावी लागली होती.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.