Kangana Ranaut होणार पंतप्रधान? अभिनेत्रीकडून मोठा खुलासा
Kangana Ranaut : कंगना रनौत हिची राजकारणात होणार दमदार एन्ट्री, अभिनेत्री होणार पंतप्रधान? मोठी माहिती समोर... कायम वादाचा मुकूट आपल्या डोक्यावर मिरवणारी कंगना अनेकदा वादाच्या भोवऱ्यात देखील अडकली आहे.
मुंबई : 11 फेब्रुवारी 2024 | अभिनेत्री कंगना रनौत फक्त तिच्या सिनेमांमुळेच नाही तर, स्पष्ट वक्तव्यामुळे देखील चर्चेत असते. कंगना राजकिय मुद्द्यांवर देखील भाष्य करत असते. अनेकवेळा अभिनेत्रीचे चाहते तिला राजकारणात प्रवेश करणार का? असा प्रश्न विचारत असतात. नुकताच झालेल्या एका कार्यक्रमात कंगना हिला पंतप्रधान व्हायचं आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर कंगना हिने लक्षवेधी उत्तर दिलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त कंगना हिची चर्चा रंगली आहे. नुकताच कंगना हिच्या Razakar: Silent Genocide Of Hyderabad सिनेमाच्या ट्रेलर लॉन्च कार्यक्रम पार पडला.
Razakar: Silent Genocide Of Hyderabad सिनेमाच्या ट्रेलर लॉन्च दरम्यान अभिनेत्रीला देशाची पंतप्रधान होण्याचा काही प्लॅन आहे का? असा प्रश्न विचारला. यावर अभिनेत्री म्हणाली, ‘मी नुकताच ‘इमर्जन्सी’ नावाचा सिनेमा बनवला आहे. तो सिनेमा पाहिल्यानंतर कोणीलाही मला पंतप्रधान म्हणून पाहावेसं वाटणार नाही. सध्या सर्वत्र कंगना हिच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.
बॉलिवूड क्वीन्स सध्या आगामी ‘इमर्जन्सी’ सिनमामुळे चर्चेत आहेत, जो लवकरच प्रदर्शित होणार असल्याची शक्यता आहे. अनेक भूमिका साकारत चाहत्यांच्या भेटीस आलेली कंगना आता ‘इमर्जन्सी’ सिनमात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणार आहे. सिनेमात श्रेयस तळपदे, अनुपम खेर, महिमा चौधरी आणि पुपूल जयकर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.
कंगना कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. एवढंचन नाही तर, कायम वादाचा मुकूट आपल्या डोक्यावर मिरवणारी कंगना अनेकदा वादाच्या भोवऱ्यात देखील अडकली आहे. कंगना सोशल मीडियावर कायम कोणत्या न कोणत्या मुद्द्यावर स्वतःचं मत मांडत असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.
कंगना रनौत हिचे आगामी सिनेमे
अभिनेत्री कंगना रनौत ‘इमरजेन्सी’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात कंगना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमा सुरुवातील नोव्हेंबर 2023 मध्ये प्रदर्शित होणार होता. पण आता सिनेमा 2024 मध्ये प्रदर्शित होणार असल्याची माहिती समोर येत आहे. सिनेमा चाहत्यांच्या पसंतीस उतरतो का? हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.