‘या’ मतदार संघातून कंगना राणावत लढणार लोकसभेची निवडणूक? अत्यंत मोठा खुलासा
कंगना राणावत ही नेहमची चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. कंगना राणावत हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. कंगना राणावत आणि वाद हे समीकरण गेल्या काही दिवसांपासून सतत बघायला मिळतंय. बाॅलिवूड कलाकारांवर टीका करताना कंगना राणावत दिसते.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून कंगना राणावत हिचे चित्रपट एका मागून एक फ्लाॅप जाताना दिसत आहेत. कंगनाच्या चित्रपटाला अजिबातच धमाका करता येत नाहीये. मध्यंतरी एक चर्चा तूफान रंगताना दिसली की, कंगना राणावत आता थेट राजकारणात उतरणार आहे. चंदीगडमधून लोकसभा निवडणूक कंगना लढणार आहे. आता शेवटी कंगना राणावत हिने या चर्चांवर थेट मोठे भाष्य करत खुलासा केलाय. कंगना राणावत नेहमीच बीजेपीला सपोर्ट करताना दिसते. यामुळेच बीजेपीकडून कंगना निवडणूक लढणार असल्याचे सांगितले गेले.
कंगना राणावत हिने नुकताच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीये. कंगना राणावत हिने शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिने काही फोटो शेअर केले. यामध्ये कंगना राणावत ही चंदीगडमधून लोकसभेची निवडणूक लढणार असे लिहिल्याचे बघायला मिळतंय. कंगना हिने त्यावर मोठा खुलासा या पोस्टमध्ये केल्याचे बघायला मिळतंय.
कंगना राणावत हिने स्पष्टपणे सांगितले की, या अफवा आहेत. म्हणजेच काय तर कंगना राणावत हिने निवडणूक लढवण्याचे अजून ठरवले नाहीये. मात्र, रिपोर्टनुसार कंगना राणावत ही या जागेसाठी इच्छुक असल्याचे सांगितले जातंय. पुढील काही दिवसांमध्ये याबद्दल स्पष्टता नक्कीच बघायला मिळेल. कंगनाचा काही दिवसांपूर्वीच चित्रपट रिलीज झाला.
आता कंगना राणावत हिने शेअर केलेली ही पोस्ट तूफान व्हायरल होताना दिसतंय. कंगना राणावत हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. कंगना राणावत हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. अनेकदा कंगना राणावत तिच्या विधानांमुळे अडचणीमध्ये सापडताना देखील दिसते. नेहमीच ती बाॅलिवूड कलाकारांवर टीका देखील करते.
कंगना राणावत हिने काही दिवसांपूर्वी थेट रणबीर कपूर याच्यावर टीका केली. फक्त रणबीर कपूर हाच नाही तर अनेकदा कंगना हिच्या निशाण्यावर करण जोहर हा देखीस बघायला मिळतो. करण जोहर याच्या शोमध्ये अनेक स्टार किड्स बोलवण्यात आले. मात्र, कंगना राणावत हिला करण जोहर याने आपल्या शोमध्ये बोलावले नाही. यानंतर अनेकांनी थेट करण जोहर याला खडेबोल सुनावल्याचे बघायला मिळाले.