माझं जर चुकत असेल तर बरोबर करा म्हणत कंगनाला शबाना आझमीनी दिलं उत्तर…

माझं जर चुकत असेल तर बरोबर करा, अफगानिस्तान हे एक धार्मिक राज्य आहे. आणि जेव्हा मी भारताविषयी बघितलं तर समजलं की, हिंदुस्थान हा धर्मनिरपेक्ष लोकशाही आणि प्रजासत्ताक देश होता ?

माझं जर चुकत असेल तर बरोबर करा म्हणत कंगनाला शबाना आझमीनी दिलं उत्तर...
Follow us
| Updated on: Feb 11, 2022 | 6:17 PM

मुंबईः शबाना आझमी (Shabana Azmi) यांच्याबरोबरच जावेद अख्तर यांनी बुरखा आणि हिजाब प्रकरणावर आपले मत व्यक्त केले आहे. जावेद अख्तर (Javed Akhtar) यांचे मत आहे की, बुरखा किंवी हिजाबसाठी (Hijab) मी कधीच समर्थन केले नाही, मात्र मुली आणि महिलांवर होणारी ही टीका निंदनीय आहे. शबाना आझमी, जावेद अख्तर, स्वरा भास्कर, ऋचा चढ्ढा आणि सोनम कपूर यासारख्या अभिनेत्रींनीही हिजाबच्या वादावर आपले मत नोंदवले आहे. कर्नाटकातील हिजाब प्रकरणावरून देशभर वादंग माजला आहे.

देशातील सामान्य माणसांपासून ते अगदी नेते आणि अभिनेत्यांनी यावर मत नोंदवले आहे. काही लोकांनी कर्नाटक सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आहे तर काहींनी सरकारवर टीकाही केली आहे. नेहमीच वादग्रस्त मुद्यांवर आपले मत व्यक्त करुन चर्चेत राहणारी कंगना रनौतही या मुद्यावरुन पुन्हा चर्चेत आली आहे. कंगनाच्या मुद्यावर अभिनेत्री शबाना आझमीने आपले मत व्यक्त केले आहे.

कंगनाचं संदर्भहीन पोस्ट

कंगना रनौतने हिजाबच्या मुद्यावर बोलताना तिने म्हटले होते की, जर तुमच्यात हिम्मत असेल तर अफगानिस्तानमध्ये बुरखा न घालता फिरुन दाखवा, पिंजऱ्यातून मुक्त होण्याचा प्रयत्न करा असं ती इंन्स्टाग्रामरवरून पोस्ट करुन म्हणाली. या तिच्या पोस्टवरुन शबाना आझमींना रहावलं नाही म्हणून त्यांनी आपले मत तिच्या पोस्टवर व्यक्त केले आहे.

माझं जर चुकत असेल तर बरोबर करा

इन्स्टाग्रामवर पोस्ट करत त्या म्हणाल्या की, माझं जर चुकत असेल तर बरोबर करा, अफगानिस्तान हे एक धार्मिक राज्य आहे. आणि जेव्हा मी भारताविषयी बघितलं तर समजलं की, हिंदुस्थान हा धर्मनिरपेक्ष लोकशाही आणि प्रजासत्ताक देश होता ? या त्यांच्या प्रश्नार्थक पोस्टवर अनेक लोकांनी रिप्लाय दिला आहे आणि तुम्ही बरोबर बोलत असल्याचं सांगत आहेत. त्यांच्या या पोस्टवर आलेल्या या प्रतिक्रिया या सगळ्या त्यांच्या समर्थनाथ आहेत. शबाना आझमी ही गोष्ट फक्त हिजाबबाबतच बोलतात असं नाही तर त्या घडत असणाऱ्या अनेक मुद्यांवर आपले मत व्यक्त करत असतात.

शबाना आझमी यांच्यासह जावेद अख्तर यांनीही बुरखा आणि हिजाबच्या मुद्यावर आपले मत मांडले आहे. जावेद अख्तर म्हणतात, हिजाब किंवा बुरखा पद्धतीचे मी कधीच समर्थन केले नाही. मात्र हा मुद्दा समोर आणून महिलांवर जे गलिच्छ आरोप केले जात आहेत ते चुकीचे आणि निंदनीय आहेत. हे बोलत असताना त्यांनी सरकारवर टिप्पणी करताना म्हणाले आता हे बघावे लागेल की यावर सरकार आपले मत काय व्यक्त करते.

संबंधित बातम्या

Madhuri Dixit Photos : माधुरी दिक्षितचे फोटो पाहून तुमचंही मन धकधक करायला लागेल, फोटो एकदा बघाच…

प्रसिद्ध दिग्दर्शक रवि टंडन यांचं निधन; रविनाची वडिलांसाठी भावूक पोस्ट, म्हणाली, “आप हमेशा मेरे साथ चलेंगे पापा…”

‘लोच्या झाला रे’ परदेशातही प्रदर्शित होणार, चित्रपटाची टीम सातासमुद्रापार धम्माल करणार

'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...