कंगनाची लवकरच ओटीटीवर एंट्री; डेटिंग रिअ‍ॅलिटी शो करणार होस्ट?

बॉलिवूडची क्वीन कंगना राणौत (Kangana Ranaut) आता चित्रपटानंतर लवकरच ओटीटीवर (ott) दिसणार आहे. मात्र ती जरी ओटीटीवर दिसणार असली तरी देखील ती इतर कलाकारांप्रमाणे वेब फिल्म किंवा सिरिजमध्ये (Web series) काम करणार नाही, तर ती एका रिअ‍ॅलिटी शोचे सूत्रसंचालन करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

कंगनाची लवकरच ओटीटीवर एंट्री; डेटिंग रिअ‍ॅलिटी शो करणार होस्ट?
कंगना राणौत
Follow us
| Updated on: Feb 01, 2022 | 9:17 PM

बॉलिवूडची क्वीन कंगना राणौत (Kangana Ranaut) आता चित्रपटानंतर लवकरच ओटीटीवर (ott) दिसणार आहे. मात्र ती जरी ओटीटीवर दिसणार असली तरी देखील ती इतर कलाकारांप्रमाणे वेब फिल्म किंवा सिरिजमध्ये (Web series) काम करणार नाही, तर ती एका रिअ‍ॅलिटी शोचे सूत्रसंचालन करणार असल्याची माहिती समोर येत आहे. कंगना एका ओटीटी रिअ‍ॅलिटी शोमध्ये होस्ट म्हणून दिसणार आहे. एकता कपूर या शोची निर्मिती करणार असल्याची माहिती समोर येत आहे. रिपोर्टनुसार, हा शो डेटिंग आणि रोमान्सवर आधारित आहे. कंगना करणार असलेल्या या शोची प्रेरणा ही लोकप्रिय अमेरिकन रिअ‍ॅलिटी डेटिंग शो टेम्पटेशन आयलंडपासून घेण्यात आल्याचे बोलले जात आहे. लवकरच एकता कपूर या शोची घोषणा करण्याची शक्यता असून, आतापर्यंतचा हा भारतातील असा पहिला शो असणार आहे.

पोस्ट व्हायरल

कंगनाने नुकतीच या संदर्भात एक पोस्ट केली होती. त्यामध्ये तिने म्हटले होते की, मी लेडी बॉस एकता कपूरसोबत पहिला शो होस्ट करण्यास उत्सुक आहे. कंगनाने या पोस्टमध्ये या शो संदर्भात फार काही माहिती दिली नव्हती, मात्र त्यानंतर काही वेळातच तिने ती पोस्ट डिलिट केली. मात्र तोपर्यंत ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली असून, कंगना आता तिचा हा नवा शो घेऊन कधी एकदा ओटीटी प्लॅटफॉर्मवर येते याची उत्सुकता तिच्या चहात्यांना लागली आहे.

‘धाकड’मध्ये साकारली एजंट अग्नीची भूमिका

दरम्यान थलायवी या चित्रपटात कंगना शेवटची दिसली होती. या चित्रपटामध्ये तिने जयललिता यांची भूमिका साकाराली होती. या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाला. लवकरच कंगनाचे ‘धाकड’ आणि ‘तेजस’ हे चित्रपट रिलीज होणार आहेत. धाकडमध्ये कंगना एजंट अग्नीची भूमिका साकारणार आहे. त्याचबरोबर ती तेजसमध्ये तेजस गिलची भूमिका साकारणार आहे. यासोबतच ती आता ओटीटीवर आपला पहिला शो घेऊन येणार आहे. या शोला तिचे चाहाते कसा प्रतिसाद देतात हे पहाणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

संबंधित बातम्या

सामंथाने घेतले एका गाण्यासाठी 5 कोटी, ऑपरेशन टाळून गणेश आचार्य शुटिंगमध्ये; गाण्याचे तयार झाले लाखो रिल्स

बिग बॉसचा उपविजेता प्रतिकला भाईजानकडून खास गिफ्ट, इन्स्टावर फोटो शेअर करत प्रतिक म्हणतो, ‘आभार साहेब!’

Mere Rashke Qamarवर छोट्या उस्तादची बोटं तबल्यावर थिरकली! Video पाहून म्हणावंच लागेल ‘वाह, क्या बात है’

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.