Kangna Ranaut | करण जोहरला लाज वाटली पाहिजे… आता का भडकली कंगना रनौत ? रणवीरला तर चक्क म्हणाली…

अभिनेत्री कंगना रणौत परत एकदा करण जोहरवर भडकली आहे. परखड शब्दांत कंगनाने संताप व्यक्त केला आहे. कंगनाल भडकायला नेमकं झालं काय ?

Kangna Ranaut | करण जोहरला लाज वाटली पाहिजे... आता का भडकली कंगना रनौत ? रणवीरला तर चक्क म्हणाली...
करण जोहरवर भडकली कंगना
Follow us
| Updated on: Jul 29, 2023 | 3:27 PM

मुंबई | 29 जुलै 2023 : सतत बेधडक, वादग्रस्त वक्तव्य करणं आणि तशा पोस्ट्स शेअर करणं यामुळे अभिनेत्री कंगना रनौत (Kangna Ranaut) नेहमीच लाइमलाइटमध्ये असते. कधी आलिया भट्ट तर कधी रणबीर कपूर नाहीतर करण जोहरवर (Karan Johar) निशाणा साधत असते. आता ती पुन्हा करण जोहरवर भडकली असून त्याच्यावर तिने टीकास्त्र डागले आहे. एवढंच नव्हे तर तिने रणवीर सिंगबद्दल (Ranveer Singh) कमेंट केली असून त्याला चक्क कार्टून म्हटले आहे.

खरंतर 28 जुलै रोजी आलिया भट्ट आणि रणवीर सिंह यांचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट रिलीज झाला आहे. करण जोहरने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. ट्रेड ॲनॅलिस्ट गिरीश जौहर यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर शनिवारी सकाळी एक पोस्ट शेअर केली. ‘ शुक्रवारी रिलीज झालेले रॉकी और रानी की प्रेम कहानी आणि ब्रो हे चित्रपट अपेक्षेप्रमाणे परफॉर्म करत नाहीयेत’ असे त्यांनी लिहीले आहे.

काय म्हणाली कंगना ?

कंगनाने गिरीश यांची पोस्ट इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केली आहे. ‘ प्रेक्षक आणखी मूर्ख बनू शकत नाही. क्रिएटिव्हली खराब असलेल्या चित्रपटाला लोकांना रिजेक्ट केले आहे. खऱ्या आयुष्यात असे कपडे कोण घालतं आणि दिल्लीत अशी घरं कुठे आहेत ? ‘ असा सवालही कंगनाने या पोस्टद्वारे विचारला आहे

‘ हा काय मूर्खपणा आहे ? स्वत:च्याच कामाची कॉपी केल्याबद्दल करण जोहरला लाज वाटली पाहिजे. यावर कोणी 250 कोटी कसे खर्च करू शकतात ? ‘ असा प्रश्न विचारत तिने करण जोरवर टीकास्त्र सोडले आहे. कंगनाने या चित्रपटाला सास, बहू वाला डेली सोप म्हटले आहे. यासोबतच करण जोहरला तसाच चित्रपट पुन्हा बनवल्याबद्दल लाज वाटली पाहिजे, असेही कंगनाने म्हटले आहे.

करण जोहरवर भडकली कंगना

रणवीर सिंगला कंगनाने काय दिला सल्ला ?

करण जोहर आणि त्याचा ड्रेसिंग सेन्स यावरून प्रेरणा घेणे बंद कर, असा सल्लाही कंगनाने अभिनेता रणवीर सिंगला दिला आहे. धर्मेंद्र किंवा विनोद खन्ना हे जसे कपडे घालायचे, तसेच नॉर्मल माणसासारखे कपडे घाल, असेही तिने रणवीरला सांगितले आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.