कोरोना वादावर कनिका कपूरचे मोठे विधान, मला आणि माझ्या मुलांना जिवे मारण्याच्या धमक्या येत होत्या!

कनिका कपूर तिच्या डान्समुळे प्रसिध्द आहे तिची बरीच गाणी हिट देखील झाली आहेत. मार्चमध्ये कोरोनाची लागण कनिका कपूरला झाली होती.

कोरोना वादावर कनिका कपूरचे मोठे विधान, मला आणि माझ्या मुलांना जिवे मारण्याच्या धमक्या येत होत्या!
Follow us
| Updated on: Dec 25, 2020 | 10:50 AM

मुंबई : गायिका कनिका कपूर (Kanika Kapoor) तिच्या गाण्यांमुळे प्रसिध्द आहे तिची बरीच गाणी हिट देखील झाली आहेत. मार्चमध्ये कोरोनाची लागण कनिका कपूरला झाली होती. यादरम्यान तिच्यावर बरेच गंभीर आरोप लावण्यात आले होते. त्यावेळेला वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. आता या सर्व प्रकरणावर कनिका कपूरने तिचे मत उघडपणे मांडले आहेत. (Kanika Kapoor and her children were being threatened with death)

स्पॉटशी बोलताना कनिका म्हणाली की, “तो काळ खरोखर माझ्यासाठी खूप कठीण होता. केवळ माझ्यासाठीच नाही तर माझ्या संपूर्ण कुटुंबासाठी कारण आम्हाला खरोखर काय घडत आहे हे माहित नव्हते. अचानक मीडिया आणि लोक आमच्याविरुध्द गेले, त्याचे कारण देखील मला माहिती नव्हते. मला खूप असहाय्य वाटत होतं. मला अनेक गंभीर आरोपांचा सामना करावा लागत होता. हळूहळू मला बर्‍याच गोष्टी समजल्या.

मात्र, त्यावेळी मला एकच वाटत होते की, माझ्याविरोधात काहीही लिहिण्यापूर्वी किंवा बोलण्यापूर्वी त्यांनी सत्य जाणून घेतले पाहिजे होते. तुम्हाला पूर्ण सत्य माहिती नसेल तर तुम्ही एखाद्याबद्दल लिहणे चुकीचे आहे. पुढे कनिका कपूर म्हणाली की, मला त्यावेळी धमकावले गेले होते. त्यावेळी मी खूप अस्वस्थ होतो, कारण मला व माझ्या कुटुंबाला मला जिवे मारण्याची धमकी मिळत होती. लोक म्हणत होते की, आपण स्वत: ला मारून टाकले पाहिजे आहे.

बरेच लोक म्हणत होते की, तुझे करिअर आता संपले आहे. हा काळ माझ्यासाठी कठिण होता मात्र, यावेळी माझे मित्र आणि कुटुंबिय माझ्याबरोबर होते. नुकताच कनिकाचे जुगनी 2.0 हे गाणे आले आहे. यापूर्वी गुगल इंडियाने 2020 च्या सर्वाधिक सर्च केलेल्या सेलिब्रिटींची यादी जाहीर केली होती, यात पाच चित्रपट सेलिब्रिटींची नावे आहेत. कनिका कूपर तिसर्‍या क्रमांकावर होती.

संबंधित बातम्या : 

Satyameva Jayate 2 |ॲक्शन सीन दरम्यान जॉन अब्राहमला दुखापत, चित्रपटाचे शूटिंग थांबवले!

Shahid Kapoor | धर्मा प्रॉडक्शनच्या बिग बजेट चित्रपटातून शाहिद कपूर आऊट! वाचा काय घडलं..

Kangana Ranaut | ट्रोलर्सला कंगनाचे जोरदार प्रत्युत्तर, धर्माच्या मार्गाने चला, धर्माचे ठेकेदार बनू नका!

(Kanika Kapoor and her children were being threatened with death)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.